मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पापाराझींनी काळजीपोटी Janhvi Kapoorची केली विचारपूस, पण मॅडमनं दाखवला भलताच Attitude; फॅन्सनी केलं ट्रोल

पापाराझींनी काळजीपोटी Janhvi Kapoorची केली विचारपूस, पण मॅडमनं दाखवला भलताच Attitude; फॅन्सनी केलं ट्रोल

Janhvi Kapoor

Janhvi Kapoor

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor ) हिला दुखापत झाली आहे. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंबई, 12 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor ) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतेच. सध्या ती तिच्या हाताच्या दुखापतीमुळे (Janhvi Kapoor suffers injury in left arm)चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, तो व्हिडीओ पाहून यूजर्स तिला ट्रोल करताना दिसत आहेत. तिच्या हाताला दुखापत आणि युजर्स तिला ट्रोल का करत आहेत? अशी चर्चा बी टाउनमध्ये रंगली आहे.

जान्हवीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या हाताला स्लिंग घालण्यात आले आहे. पापाराझींची नजर जान्हवी कपूरवर पडताच सगळ्यांनी विचारले जान्हवी काय झालं? मात्र अभिनेत्रीने काहीही उत्तर दिले नाही. इतकं की पापाराझींनीही तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं, पण जान्हवी काहीही न बोलता तिच्या गाडीत बसली.

तिची ही भूमिका पाहून यूचर्सनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यता सुरुवात केली आहे. एका यूजरने म्हटले आहे की, इतका अॅट्टीट्यूड बर नव्हे. ' तर दुसऱ्या यूजरने लिहिले, 'मीडिया लोक इतके विचारत आहेत, पण अभिनेत्रीने किमान काहीतरी बोलायला हवे होते.' दुसऱ्या यूजरने 'किती? घमेंडी आहे.'

जान्हवी कपूर याआधीही अनेकदा ट्रोल झाली आहे, नुकत्याच आलेल्या एका व्हिडिओमध्ये जान्हवीला शॉर्ट ड्रेस आणि हाय हील्समध्ये पाहून पापाराझी तिला फोटो क्लिक करण्यास सांगितले होते. मात्र, ती कारमध्ये बसून, 'माफ करा, उशीर होत आहे.' असे उत्तर देते. त्यावेळी जान्हवीवर चाहत्यांनी नाराजी दर्शवली. जान्हवीला अॅट्टीट्यूड असल्याचे युजर्सनी म्हटले होते.

जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून बी टाउनमध्ये पदार्पण केले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांची आई श्रीदेवी यांचे अकाली निधन झाले. अभिनेत्री तिच्या आईच्या खूप जवळ होती. जान्हवीने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे.

'मिली' चित्रपटाव्यतिरिक्त जान्हवी कपूर 'दोस्ताना 2' या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या बॅनरखाली बनत आहे. यासोबतच जान्हवी कपूर 'गुल लक जेरी' या चित्रपटातही दिसणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Janhvi kapoor