मुंबई, 13 नोव्हेंबर : सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेत कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यातही ताराराणी यांच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्स घेतल्यानंतर ताराराणी यांच्या भूमिकेसाठी स्वरदा ठिगळे या अभिनेत्रीची निवड करण्यात आली. आता याच भूमिकेबद्दल एक माहिती समोर आली आहे. ताराराणी यांच्या बालपणीची भूमिका या मालिकेचे निर्माते आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr amol kolhe) यांची मुलगी आद्या कोल्हे (adya kolhe )साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठी सिरियल इन्स्टा या पेजवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यामध्ये अमोल कोल्हे व त्यांच्या मुलीचा फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत अमोल कोल्हे यांची मुलगी आद्या कोल्हे ही तारारणींची बालपणीची भूमिका पडद्यावर साकारणार आहे. वाचा : ‘झाँसी की रानी’ फेम अभिनेत्रीनं दिली Good News! थंगाबली लवकरच बनणार ‘बाबा’ छत्रपती संभाजी महाराजांचा महापराक्रमी इतिहास सर्वांसमोर मांडणाऱ्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांच्या मुलींन एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. मालिकेमध्ये आद्याने स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी तारा हिची भूमिका निभावली होती. तिच्या या भूमिकेचे कौतुक झाले होते. आत तिला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
यासोबतच या मालिकेत अभिनेता संग्राम समेळ ( sangram samel ) छत्रपती राजाराम महाराजांची भूमिका साकारणार आहे. नुकताच या मालिकेतील छत्रपती राजाराम राजे यांचा फर्स्ट लुक समोर आला आहे. चाहत्यांनी देखील या लुकला चांगलीच पसंती दिली आहे. वाचा : अमोल कोल्हे यांच्या एकांतवासावरून पडदा हटला; स्वत: VIDEO पोस्ट करत सांगितलं कारण डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.