जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD: चित्रपटासाठी हेमा मालिनी यांचं बदलण्यात आलं होतं नाव; मात्र अभिनेत्रीने दिला होता नकार, वाचा किस्सा

HBD: चित्रपटासाठी हेमा मालिनी यांचं बदलण्यात आलं होतं नाव; मात्र अभिनेत्रीने दिला होता नकार, वाचा किस्सा

HBD: चित्रपटासाठी हेमा मालिनी यांचं बदलण्यात आलं होतं नाव; मात्र अभिनेत्रीने दिला होता नकार, वाचा किस्सा

बॉलिवूडची(Bollywood) ‘ड्रीमगर्ल’म्हणून अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांना ओळखलं जातं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,16 ऑक्टोबर- बॉलिवूडची**(Bollywood) ‘**ड्रीमगर्ल’म्हणून अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांना ओळखलं जातं. बॉलिवूडमधील ही यशस्वी अभिनेत्री सध्या राजकारणात आपली धमक दाखवून देत आहे. त्यांनी प्रत्येक भूमिका अगदी उत्कृष्टरित्या साकारली आहे. शोलेमधील ‘बसंती’ असो किंवा सीता और गीतामध्ये दुहेरी भूमिका असो या अभिनेत्रीने प्रत्येक भूमिका अजरामर केली आहे. मात्र फारच कमी लोकांना हे माहिती आहे, की हेमा मालिनी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांना नाव बदलण्यासाठी तगादा लावण्यात आला होता.

News18

अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या आईची इच्छा होती की आपली मुलगी जी नृत्यात निपुण आहे ती मोठी नृत्यांगना आणि नायिका व्हावी. हेमा यांनी जेव्हा आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चित्रपट जगतात करिअर करण्याचा विचार केला, तेव्हा त्यांचे नाव चित्रपट निर्मात्याला आवडले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, त्याला हेमा मालिनी हे नाव ग्लॅमरस नाही, म्हणून नाव बदलून सुजाता असं ठेवण्यास आलं होतं.इतकंच नव्हे तर तामिळ चित्रपट दिग्दर्शक श्रीधरने यांनी त्यांना असं म्हणत नाकारलं की त्यांच्यामध्ये कोणतीही स्टार कॉलिटि नाहीय, किंवा चेहऱ्याला स्टार अपियरन्स नाही. यामुळे हेमा मालिनी आणि त्यांच्या आई खूप दुःखी झाल्या होत्या. (**हे वाचा:** बापरे! उर्वशी रौतेलाच्या हातातून पडला iPhone 13; अन् पुढे जे घडलं पाहा VIDEO ) हेमा मालिनी या नकाराने दु: खी झाल्या होत्या, पण त्याचा फारसा परिणाम त्यांच्यावर झाला नव्हता. उलट, त्यांना आनंद झाला की तिचा नृत्य सराव सुरू राहील. पण आईला दु: खी पाहून हेमा यांनी ठरवलं की त्या सुद्धा चित्रपटांमध्ये अभिनेत्री बनणार मात्र आपलं नाव बदलणार. काही तमिळ चित्रपटांमध्ये किरकोळ भूमिका साकारल्यानंतर हेमा मालिनी यांनी मायानगरी मुंबईमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा त्यांची भेट एका अशा व्यक्तीशी झाली ज्यांना पहिल्याच भेटीत समजलं कि हेमा या एक हिरा आहेत. आणि त्यांना योग्य चकाकी दिल्यास त्यांची चमक सर्वत्र पसरेल. (**हे वाचा:** OMG! टॉम क्रूझला पाहून चाहते झाले हैराण; अभिनेत्याला अशा अवस्थेत ओळखणंही.. ) खरं तर, हेमा मालिनी यांची हि भेट चित्रपट निर्माता आणि जेष्ठ अभिनेता शो मॅन राज कपूर यांच्याशी झाली होती. त्यांनतर हेमा यांनी चित्रपट दिग्दर्शक महेश कौल यांच्या स्क्रीन टेस्टमध्ये इतका उत्कृष्ट अभिनय केला की त्यांना ‘सपनो का सौदागर’ चित्रपटात नायिका म्हणून कास्ट केलं गेलं. जरी हा चित्रपट फारसा गाजला नसला तरी हेमायांनी यानंतर कधीच मागे वळून पहिले नाही. हेमा यांना पहिलं यश ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटातून मिळालं. या चित्रपटात त्यांची देव आनंदसोबतची जोडी खूप पसंत करण्यात आली होती. 1971 मध्ये रमेश सिप्पीने हेमा यांच्यासोबत ‘अंदाज’ हा चित्रपट बनवला होता, ज्यात शम्मी कपूर आणि राजेश खन्ना यांची भूमिका होती. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला. यानंतर हेमा मालिनीने चित्रपटसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट देत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात