टॉम क्रूझकडे बघून असं वाटत आहे, की त्याचं मोठ्या प्रमाणात वजन वाढलं आहे. त्याचा चेहरा पूर्वीपेक्षा खूपच वेगळा दिसत आहे. अलीकडेच, अभिनेता अमेरिकेत बेसबॉल खेळ पाहण्यासाठी आला होता. या दरम्यान त्याने ब्लॅक जॅकेट घातलं होतं. टॉम क्रूझ हसत हसत सामन्याचा आनंद घेत होता. दरम्यान त्याची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टॉम क्रूज लवकरच 'मिशन इम्पॉसिबल 7' चित्रपटात दिसणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.What has Tom Cruise done to his face. pic.twitter.com/2ZspdscpdD
— Ellis Belle (@EllisBelle1) October 11, 2021
टॉम क्रूझने आपला लूक आणि अभिनयाने सर्वांनां वेड लावलं आहे. त्याचे प्रचंड चाहते आहेत. त्याची ही छायाचित्रे पाहून अनेक चाहते असेही म्हणत आहेत की त्याने शस्त्रक्रिया केली आहे, त्यामुळे तिचा चेहरा सुजला आहे. त्याच वेळी, काही चाहते असे म्हणत आहेत की ही व्यक्ती टॉम क्रूझसारखी दिसत आहे का?नेहमी टॉम क्रूजला पाहून जसा आनंद होतो यावेळी मात्र चाहते त्याला पाहून अधिक गोंधळून जात आहेत.I’m pretty sure these pics are definitive proof #TomCruise went from #TopGun to #TopChef? #BREAKING #BreakingNews #Trending #TMZ #TheMoreYouKnow pic.twitter.com/ohrYPNgoJ2
— Alan Boccadoro (@bocc1_) October 15, 2021
टॉम क्रूझच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर टॉम क्रूज लवकरच 'मिशन इम्पॉसिबल 7' मध्ये दिसणार आहे. तो शेवटचं 'मिशन: इम्पॉसिबल फॉलआउट' मध्ये दिसला होता. या व्यतिरिक्त, अभिनेत्याकडे 'टॉप गन: मॅव्हरिक' हा चित्रपट देखील आहे, तो लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार आहे. (हे वाचा:अबब!उर्वशी रौतेलाने परिधान केला इतक्या लाखांचा सिन्ड्रेला ड्रेस! पाहा VIDEO) टॉम क्रूझच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.सध्या टॉम क्रूझ ५९ वर्षांचा आहे. मात्र आजही त्याने लोंकांना वेड लावल आहे. त्याच्या ऍक्शन चित्रपटांतुन तो चाहत्यांना घायाळ ठरत असतो. या वयातही त्याचा ऍक्शन धमाका पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो.#TomCruise @TomCruise pic.twitter.com/nxsncXlmRb
— Shrestha Jakhetiya (@Shrestha1008) October 14, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Hollywood