मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बापरे! उर्वशी रौतेलाच्या हातातून पडला iPhone 13; अन् पुढे जे घडलं पाहा VIDEO

बापरे! उर्वशी रौतेलाच्या हातातून पडला iPhone 13; अन् पुढे जे घडलं पाहा VIDEO

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या स्टाईल आणि सौंदर्याने लोकांना वेड लावते.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या स्टाईल आणि सौंदर्याने लोकांना वेड लावते.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या स्टाईल आणि सौंदर्याने लोकांना वेड लावते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 15ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या स्टाईल आणि सौंदर्याने लोकांना वेड लावते. उर्वशी, तिच्या स्टाईल आणि महागड्या पोशाखांमुळे चर्चेत असते. मात्र नुकताच तिला मोठं नुकसान झालं आहे. अलीकडे, तिचा आयफोन 13 (Iphone 13) अचानक हातातून पडला, त्यानंतर तिने पापाराझीला दिलेल्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि हेच कारण आहे की लोक तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. अलीकडेच, अभिनेत्री तिच्या कारमधून खाली उतरत असताना, तिचा नवीन आयफोन 13 (Iphone 3) खाली रस्त्यावर पडला. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील हावभाव फोनच्या खाली पडताच बदलतात.

विरल भयानीने अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अभिनेत्रीचा फोन खाली पडताच ती एकदम हडबडते आणि चिंतीत होते. ती ताबडतोब तिचा फोन रस्त्यावरून खाली उचलते आणि फोन पुन्हा पुन्हा पाहते, पण तिने फोन उचलताच तिच्या चेहऱ्याचा रंग थोडा उडालेला दिसतो. तिथे काही पपाराझी सुद्धा म्हणतात. मॅडमचा आयफोन 13 प्रो पडला. मात्र, फोन पडल्यानंतर अभिनेत्री कॅमेराकडे दुर्लक्ष करून पुढे जाते.

(हे वाचा:अबब!उर्वशी रौतेलाने परिधान केला इतक्या लाखांचा सिन्ड्रेला ड्रेस! पाहा VIDEO)

उर्वशी रौतेला खरोखरचं बॉलिवूडची एक परमसुंदरी आहे. ती आपल्या प्रत्येक लूकसाठी विशेष मेहनत घेत असते. तेच स्वतःला फिट ठेवण्यासाठी सतत जिममध्ये घाम गाळत असते. अभिनेत्री अप्लाय फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीतदेखील फारच सजग असते. तिने अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत.अलीकडे ती प्रसिद्ध डिझायनर मायकल सिनकोसाठी रॅम्प वॉक करताना दिसून आली. यावेळी ती खूप सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर डिझायनरसोबत रॅम्प वॉकची एक झलक शेअर केली होती. उर्वशी रौतेलाने यामध्ये एक प्रचंड घेरदार बॉल गाउन ड्रेस घातला होता. उर्वशी रौतेलाच्या या बॉल गाऊन ड्रेसची किंमत 40 लाख रुपये आहे.

First published:

Tags: Entertainment, Urvashi rautela