मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /या गोंडस फोटोमागे दडलाय ड्रामा क्वीनचा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला?

या गोंडस फोटोमागे दडलाय ड्रामा क्वीनचा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला?

अभिनेत्रीने स्वतःच आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्यावर प्रतिक्रिया मागवल्या आहेत.

अभिनेत्रीने स्वतःच आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्यावर प्रतिक्रिया मागवल्या आहेत.

अभिनेत्रीने स्वतःच आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्यावर प्रतिक्रिया मागवल्या आहेत.

    मुंबई, 17 मार्च : अनेक सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर (social media) आपले लहानपणीचे (childhood photo) किंवा अगदी तरुणपणातील फोटो शेअर करत असतात. काही जण त्यांच्या चेहऱ्यावरून पटकन ओळखता येतात तर काहींना ओळखणं अशक्यच असतं. कारण त्यांच्यात इतका बदल झालेला दिसतो ना? की त्यांना ओळखणंच कठीण असतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका फोटोची चर्चा आहे. तुम्ही आता जो फोटो पाहिला तो कुणाचा आहे ओळखलंत का? ही अभिनेत्री बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते. हा फोटो चक्क अभिनेत्री राखी सावंतचा (Actress Rakhi Sawant) आहे.

    बिग बॉसच्या (Bigg Boss) घरामध्ये चँलेजर म्हणून एन्ट्री घेतलेल्या राखी सावंतने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं आणि त्यांना खूप हसवलं. बिग बॉसच्या घरामध्ये असताना राखी सावंतला आपल्या चाहत्यांचं मन जिंकण्यात यश आलं. दरम्यान ती सोशल मीडियावरही (Social Media) अॅक्टिव्ह असते. आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram) नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिनं आपला लहानपणापासून ते आतापर्यंतच्या प्रवास दाखवला आहे.

    राखी सावंतने आपल्या आतापर्यंच्या प्रवासाचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास... मी खूप खुश आहे. मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेत. कृपया माझ्या लहानपणीच्या फोटोवर तुमची प्रतिक्रिया द्या.', असं म्हटलं आहे. राखीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

    हे वाचा - आयुष्यमान खुरानासाठी पत्नी ताहिराचा भावनिक VIDEO; प्रेमाच्या आठवणींना दिला उजाळा

    राखी सावंत 24 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत असून तिनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटसृष्टीमध्ये तिला राखी सावंत या नावाने ओळखलं जात असली तरीसुद्धा तिचं खरं नाव नीरू भेदा आहे. नीरुने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तिने आपले नाव बदलून राखी सावंत ठेवले.

    राखीने बालपणी खूप अडचणींचा सामना केला आहे. ती आपल्या कुटुंबासोबत मुंबईमधील एका छोट्याशा चाळीत राहत होती. घरामध्ये अनेक बंधनं असताना देखील राखी सावंतनं बॉलिवूड आणि अभिनय क्षेत्रात आपलं करिअर बनवण्याचा निश्चय केला होता. चित्रपटात येण्यापूर्वी राखी सावंतने खूप संघर्ष केला आहे.

    2007 मध्ये राखीनं एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'तिचे कुटुंब खूपच गरीब होतं.  10-12 वर्षांची असताना तिने टीना अंबानींच्या लग्नामध्ये 50 रुपयांसाठी वाढप्याचं काम केलं होतं.'

    हे वाचा - नाद नाही करायचा! राणादांच्या 'पाठकबाईं'चा ग्लॅमरस अंदाज... पाहा VIDEO

    चित्रपटसृष्टीमध्ये राखी सावंतने नावासोबत पैसा देखील कमवला आहे. सध्या राखी सावंत आपल्या आईचा सांभाळ करत आहे. तिच्या आईला कॅन्सर झाला आहे आणि किमोथेरपी सुरू आहे. राखी सावंतचे चाहते तिची आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment, Rakhi sawant, Rakhi Sawant (TV Actor)