मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नाद नाही करायचा! राणादांच्या 'पाठकबाईं'चा ग्लॅमरस अंदाज...पाहा VIDEO ओळखणंही झालं कठीण!

नाद नाही करायचा! राणादांच्या 'पाठकबाईं'चा ग्लॅमरस अंदाज...पाहा VIDEO ओळखणंही झालं कठीण!

तुझ्यात जीव रंंगला मालिकेतल्या साध्यासुध्या राणाच्या तितक्याच साध्या ‘पाठकबाई' (pathak bai) म्हणजेच अक्षया देवधरने (akshaya deodhar) सोशल मीडियावर पूर्ण मेकओव्हर वाटावेत असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

तुझ्यात जीव रंंगला मालिकेतल्या साध्यासुध्या राणाच्या तितक्याच साध्या ‘पाठकबाई' (pathak bai) म्हणजेच अक्षया देवधरने (akshaya deodhar) सोशल मीडियावर पूर्ण मेकओव्हर वाटावेत असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

तुझ्यात जीव रंंगला मालिकेतल्या साध्यासुध्या राणाच्या तितक्याच साध्या ‘पाठकबाई' (pathak bai) म्हणजेच अक्षया देवधरने (akshaya deodhar) सोशल मीडियावर पूर्ण मेकओव्हर वाटावेत असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

मुंबई,16 मार्च: टीव्ही मालिकांमध्ये साध्या सोज्वळ सुनांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री (marathi TV actress) आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र तितक्याच बोल्ड (bold)आणि स्टायलिश (stylish) असतात. या अभिनेत्रींचं ग्लॅमरस रूप त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून दिसून येतं. त्यांच्या प्रत्येक लुकबद्दल चाहत्यांनाही तितकीच उत्सुकता लागलेली असते. सध्या सोशल मीडियावर(social media) अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून रसिकांची लाडकी सून 'तुझ्यात जीव रंगाला’ (tuzyat jeev rangala)मधील  ‘पाठकबाई' (pathak bai) म्हणजेच अक्षया देवधर (akshaya deodhar)आहे.

नुकताच अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम (instagram)अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती सुंदर अशा पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये वॉक करताना दिसत आहे. आणि या व्हिडीओला शाहरुख खानच्या(shaharukh khan) ‘मै हुं ना’ (main hun na)चित्रपटातील एक सुंदर गाणंही (song)बसवण्यात आलं आहे. या पांढऱ्या रंगाच्या पाश्च्यात ड्रेसमध्ये अक्षया खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करताच तो मोठ्या प्रमाणत व्हायरल देखील झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

‘तुझात जिव रंगला’ या मालिकेत पारंपरिक कॉटनच्या साड्यांमध्ये आणि चुडीदारमध्ये दिसणाऱ्या अंजलीला या बोल्ड अंदाजात बघून चाहते चांगलेच खुश झाले आहेत. अनेकजण अंजलीचं कौतुकही करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेन निरोप घेतला आहे. त्यामुळे यातील अनेक कलाकार आपल्या खाजगी आयुष्याचा आनंद घेत आहेत. अंजलीही सतत आपल्या मौजमस्तीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. यात अंजली अगदी मॉडर्न अंदाजात दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अक्षयाने ‘तुझात जिव रंगला’ या झी वाहिनीवरील मालिकेतून अंजली म्हणजेच पाठकबाईचं पात्र साकारत चाहत्यांच्या मनावर आपली एक खास पकड निर्माण केली आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीवर आधारित असलेल्या या मालिकेत अंजली आणि राणाची जोडी खुपचं लोकप्रिय झाली होती. इतकचं नव्हे तर यातील ‘चालतंय की’ हा डायलॉगसुद्धा तरुणवर्गात मोठा प्रसिद्ध झाला होता.

(हे वाचा:  हा हास्यसम्राट झाला 50 वर्षांचा... त्याच्या आयुष्याच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी)

अक्षयाही मूळची पुण्याची रहिवासी आहे. अक्षयानं मालीकेत येण्यापूर्वी नाटकातसुद्धा काम केलं आहे. तिनं मराठी अभिनेता अमेय वाघसोबत ‘आयटम’ हे नाटक केलं आहे. त्याचबरोबर अक्षयानं मॉडलिंगसुद्धा केलं आहे. यापूर्वी तिनं म.टा. च्या श्रावण क्वीन या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि त्यात ती विजेती देखील ठरली होती. मात्र अक्षयाला खरी ओळख मिळवून दिली ती ‘तुझात जिव रंगला’ या मालिकेने. या मालिकेद्वारे अंजलीच्या रुपात ती महाराष्ट्रातील घराघरात आणि मनातदेखील पोहचली आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment