Home /News /entertainment /

आयुष्यमान खुरानासाठी पत्नी ताहिराचा भावनिक VIDEO; प्रेमाच्या आठवणींना दिला उजाळा

आयुष्यमान खुरानासाठी पत्नी ताहिराचा भावनिक VIDEO; प्रेमाच्या आठवणींना दिला उजाळा

आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांच्या लग्नाला आज 20 वर्षे (20th Anniversary) पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर ताहिराने एक भावनिक व्हिडिओ (Emotional Video) शेअर केला आहे.

  मुंबई, 15 मार्च: बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) 'शुभ मंगल ज्यादा सावधान' आणि 'गुलाबो सीताबो' यांसारख्या चित्रपटात दर्जेदार अभिनय साकारून बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करीत आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकही आयुष्यमानला पहिली पसंती देत आहेत. फिल्मी करियरच्या पायऱ्या वेगाने चढत असतानाही तो आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही वेळ काढताना दिसतो. आज आयुष्मान आणि ताहिरा कश्यपच्या (Tahira Kashyap) लग्नाला 20 वर्षे (20th Anniversary) पूर्ण झाली आहेत. या दोघांमध्ये कमालीचे प्रेमसंबंध आहेत. ताहिरा आणि आयुष्मान दोघंही सोशल मीडियावर एकमेकांच्या भावना व्यक्त करत असतात. आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ताहिरानं दोघांच्या जुन्या फोटोंचा एक व्हिडिओ शेअर करून आयुष्मानवर असलेलं आपलं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ आता वेगात व्हायरल होतं असून अनेक चाहत्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाच्या 20 व्या वाढदिवसानिमित्त ताहिरा कश्यपनं तिचा पती आणि बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आयुष्मान खुरानाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच ताहिराने आयुष्मानवर प्रेम व्यक्त करणारा एक अनोखा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांचे जुने फोटो वापरण्यात आले आहेत. ताहिरानं या फोटोंच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांचा आपल्या लव्ह लाइफचा प्रवास सांगितला केला आहे. या व्हिडिओसोबतचं ताहिरानं एक भावनिक कॅप्शनही लिहिलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'द्वेष करणाऱ्या लोकांना हे जरा विचित्र वाटेल. पूर्वी मीही अशाच प्रकारचा विचार करायचे. पण आता प्रेमाच्या बाजूनं येणं सुखावणारं आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय मी तुझ्या प्रेमात आहे.”
  हे ही वाचा-व्हायचं होतं पत्रकार झाला अभिनेता; वाचा अभय देओलचे चकित करणारे किस्से ताहिरा कश्यप आणि आयुष्यमान खुराना एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखतात. तेव्हापासून ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांचं हे प्रेमाचं नात अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप ही एक लेखिका आहे. तिने अलिकडेच तिने जिंदगी इन शॉर्ट या वेब मालिकेसाठी कथा लिहिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Ayushmann Khurrana, Love story, Marriage

  पुढील बातम्या