Home /News /entertainment /

दीपिका पादुकोणने सोडलं सासर, नवरा रणवीरला घेऊन गेली माहेरी; समोर आलं असं कारण

दीपिका पादुकोणने सोडलं सासर, नवरा रणवीरला घेऊन गेली माहेरी; समोर आलं असं कारण

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer singh) मुंबई सोडून बंगळुरूला गेले आहेत.

  मुंबई, 15 एप्रिल : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer singh) हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कपलपैकी एक समजलं जाते. या दोघांची केमिस्ट्री लोकांना खूपच पसंत पडते. आता या कपलबाबत एक बातमी समोर येत आहे. दीपिकाने आपलं सासरचं घर सोडलं आणि नवरा रणवीरला घेऊन ती माहेरी गेली आहे. दीपिकाचं संपूर्ण कुटुंब बंगळुरूला राहतं. ती रणवीरला घेऊन बंगळुरूला गेली आहे. या दोघांना विमानतळावर सोबत स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी दोघांनीही एकसारखे कपडे परिधान केले होते. दीपिका आणि रणवीरने डेनिम कोट आणि त्यात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळी जीन्स परिधान केलं होतं.
  दीपिका आणि रणवीर बंगळुरूला जाण्याचं कारण म्हणजे लॉकडाऊन. महाराष्ट्रात (maharashtra coronavirus ) पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतं आहे. कित्येक लोकांचा मृत्यू होतं आहे. ही सर्व परस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनची (lockdown) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रात्री 8 पासून 1 मे सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. 15 दिवस फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. त्यामुळे येत्या 15 दिवस महाराष्ट्रातील चित्रपट, मालिकांच्या शूटिंगसुद्धा बंद राहणार आहेत. म्हणूनच अभिनेत्री दीपिका पादुकोण रणवीर सिंग बंगळुरूला गेले आहेत. या 15 दिवसांच्या सुट्टीचा कालावधी दीपिका आपल्या माहेरी घालवणार आहे. म्हणजेच आपल्या आई वडिलांसोबत. हे वाचा - रणबीर कपूरनं लग्न का केलं नाही?; आईनंच सांगितली अभिनेत्याची वाईट सवय) दीपिका आणि रणवीर दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. या दोघांनी रामलीला,बाजीराव मस्तानी,प द्मावत अशा प्रसिद्ध चित्रपटांत सोबत अभिनय केला आहे. त्यांची जोडी पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा चाहत्यांना भावते. तब्बल सहा वर्षे ते नात्यात होते. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. इटलीमध्ये खाजगी स्वरुपात त्यांचा लग्न सोहळा पार पडला होता. या दोघांनी हे वाचा - करीनानं सांगितलं बेडरुम सिक्रेट; झोपण्यापूर्वी लागतात या तीन गोष्टी) रणवीर आणि दीपिकाच्या आगामी फिल्मबाबत बोलायचं झालं तर अनेक चित्रपटांमध्ये ते झळकणार आहेत. या दोघांचा ‘84’ हा चित्रपट तयार आहे. हा चित्रपट 4 जूनला प्रदर्शित होणार आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. या चित्रपटात रणवीर सिंगनं भारतीय क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर दीपिका पादुकोणने कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रोमी देव यांची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर दीपिका रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटातील एका गाण्यात रणवीरसोबत थिरकताना दिसणार आहे. माध्यमांच्या माहितीनुसार दीपिकाने गाण्याचं शूटींग पूर्ण केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Deepika padukone, Ranvir singh

  पुढील बातम्या