करीनानं सांगितलं बेडरुम सिक्रेट; झोपण्यापूर्वी लागतात या तीन गोष्टी

करीनानं सांगितलं बेडरुम सिक्रेट; झोपण्यापूर्वी लागतात या तीन गोष्टी

करीनानं चाहत्यांच्या आग्रहाखातर स्वत:चं बेडरुम सिक्रेट शेअर केलं आहे. झोपण्यापूर्वी तिला या तीन गोष्टी मिळाल्या नाही तर तिला झोप लागत नाही.

  • Share this:

मुंबई 15 एप्रिल: करीना कपूर (Kareena Kapoor) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्यामुळंच चित्रपटांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ती काय खाते? कुठले कपडे घालते? तिचं घर आतून कसं दिसतं? असे प्रश्न वारंवार तिला चाहते विचारताना दिसतात. त्यामुळंच करीनानं चाहत्यांच्या आग्रहाखातर स्वत:चं बेडरुम सिक्रेट शेअर केलं आहे. झोपण्यापूर्वी तिला या तीन गोष्टी मिळाल्या नाही तर तिला झोप लागत नाही.

करीना लवकरच डिस्कव्हरी वाहिनीच्या स्टार व्हर्सेस फूड या शोमध्ये झळकणार आहे. या शोमध्ये तिनं आपलं बेडरुम सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं. ती म्हणाली, झोपण्यापूर्वी दररोज तीन गोष्टी मला लागतात. उत्तम प्रतिचा नाईट सूट, शॅम्पियनची बॉटल आणि सैफ अली खान या तीन गोष्टींशिवाय तिला झोप येते नाही. या शिवाय करीनानं आणखी काही सिक्रेट गोष्टी देखील चाहत्यांना सांगितल्या आहेत. अन् या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहत्यांनी तिचा आगामी शो पाहावा अशी विनंती तिनं आहे.

अवश्य पाहा - 'तारक मेहता' आलंय आता ‘मराठी’त; या ठिकाणी क्लिक करा अन् खळखळून हसा

स्टार व्हर्सेस फूड या शोमध्ये नामांकित सेलिब्रिटींना बोलावलं जातं. हे कलाकार त्यांचे आवडते पदार्थ किचनमध्ये जाऊन तयार करतात. यासाठी त्यांना एक प्रोफेशनल शेफ मदत करतो. पदार्थ तयार करत असतानाच त्यांना काही गंमतीशीर प्रश्न विचारले जातात. अन् या प्रश्नांची उत्तर तितक्याच गंमतीशीरपणे हे कलाकार देतात. थोडक्यात काय तर हा एकप्रकारे मुलाखतींचाच कार्यक्रम आहे. परंतु यामध्ये कुंकिंगचा ट्विस्ट टाकण्यात आला आहे.

Published by: Mandar Gurav
First published: April 15, 2021, 4:30 PM IST

ताज्या बातम्या