नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) हा बाहुबली (Bahubali) चित्रपटामुळे विशेष प्रसिद्धीच्या झोतात आला. बाहुबलीमधील त्याचा अभिनय पाहून फॅन्सनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले. बाहुबली सुपरडुपर हिट ठरला. त्यानंतर प्रभास सध्या अनेक प्रोजेक्टसवर काम करतोय. त्यात आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचादेखील समावेश आहे. हा चित्रपट हिंदूंचा महान ग्रंथ रामायणावर (Ramayan) आधारित असून, त्यात प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिका प्रभास करणार आहे. प्रसिध्द अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मेगा बजेट चित्रपटाची निर्मिती टी-सिरीज करत आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तेलगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तान्हाजी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटासाठी हॉलिवूडमधील टेक्निकल टिमला पाचारण करण्यात आले आहे. या चित्रपटाची काही स्टार कास्ट अद्याप फायनल होणे बाकी आहे. ज्यात श्रीराम यांची माता कौशल्या यांच्या रोलचाही समावेश आहे.
आदिपुरुष चित्रपटातील कौसल्येच्या रोलसाठी बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी (Hemamalini) यांचे नाव सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या रोलबाबत हेमामालिनी यांच्याशी चर्चादेखील केली आहे. हेमामालिनी या देखील या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहेत, मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची चर्चा आहे. यापूर्वी त्यांनी गौतमी पुत्र सातकर्णी या चित्रपटामध्ये गोपाळकृष्णाच्या आईची भूमिका केली होती. या भूमिकेला फॅन्सकडून विशेष पसंती मिळाली होती. त्यामुळे कौसल्येच्या रोलसाठी त्यांनी होकार द्यावा, अशी त्यांच्या फॅन्सची इच्छा आहे.
हे देखील वाचा - बाह्य जगापासून अलिप्त राहणार मनोज वाजपेयी, अंडरग्राउंड राहण्यामागे आहे हे कारण
काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटाच्या सेटला शार्टसर्किटमुळे आग लागली होती. दिग्दर्शक ओम राऊत यांनी या चित्रपटाचे मुंबईत शुटिंग सुरु केले होते. त्यानंतर सेटवर लागलेल्या आगीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाले होते. अग्निशामक दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. चित्रपटाच्या मुहुर्ताच्या शाटवेळीच ही आग लागल्याचे सांगितले जाते. मात्र दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bahubali, Bollywood, Entertainment, Prabhas, Ramayan, Saif Ali Khan, Social media, Star celebraties