गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. आज आपल्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाला आहे.
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री वीणा जगतापच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. वीणाने बाप्पासोबत फोटो शेयर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परबनेदेखील बाप्पासोबत फोटो शेयर करत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे यांनसुद्धा गणपती बाप्पानां घरी आणलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मास्क घालत कोरोना नियमांचं भान ठेवलं आहे.