जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Gangubai Kathiawadi ने 100 कोटींचा आकडा केला पार, झाली तब्बल इतकी कमाई

Gangubai Kathiawadi ने 100 कोटींचा आकडा केला पार, झाली तब्बल इतकी कमाई

Gangubai Kathiawadi ने 100 कोटींचा आकडा केला पार, झाली तब्बल इतकी कमाई

आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट गेल्या आठवड्यातच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5  मार्च-   आलिया भट्ट   (Alia Bhatt)  स्टारर ‘गंगुबाई काठियावाडी’  (Gangubai Kathiawadi)   हा चित्रपट गेल्या आठवड्यातच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. गंगुबाई काठियावाडी चित्रपटगृहात एक आठवडा पूर्ण झाला आहे. यासोबतच चित्रपटाने 100 कोटींचा टप्पाही पार केला  (Box Office Collection)  आहे. भन्साळी प्रॉडक्शनच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे. शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद.” तसेच सर्वांना माहिती देत भन्साळी प्रॉडक्शनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, या चित्रपटाने जगभरात 108.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे.तर दुसरीकडे, आलिया भट्टनेदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि लिहिलं आहे - ‘अभिनेत्री बनण्यासाठी आली होती गंगू, परंतु इथे तर पूर्ण चित्रपटच बनला’. देशात सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या हाहाकारनंतर हा चित्रपट एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे’. आलिया भट्ट, शंतनू माहेश्वरी, अजय देवगण सीमा पाहवा आणि विजय राज यांच्या प्रमुख भूमिका असलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीचा सोशल मीडियावर हवा केली होती. परंतु कोरोना महामारीमुळे चित्रपट पुढे ढकलला जात होता. बॉक्स ऑफिस कलेक्शन- गंगुबाई काठियावाडीने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे 10.50 कोटी आणि 13.32 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर तिसऱ्या दिवशी 15.30 कोटी रुपयांची कमाई झाली होती. तर चौथ्या दिवशीच्या कमाईत काहीशी घट झालेली दिसून आली. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 8.19 कोटींची कमाई केली होती. बुधवारी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आणि 6.21 कोटींची कमाई केली.त्यांनतर एकूण आकडा पाहता या चित्रपटाने आता 108.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे.सोबतच हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सहभागी झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात