जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ऐश्वर्या रायच्या 'त्या' व्हिडिओर सर्वांच्या खिळल्या नजरा, ओळखणं झालं मुश्किल

ऐश्वर्या रायच्या 'त्या' व्हिडिओर सर्वांच्या खिळल्या नजरा, ओळखणं झालं मुश्किल

ऐश्वर्या रायच्या 'त्या' व्हिडिओर सर्वांच्या खिळल्या नजरा, ओळखणं झालं मुश्किल

ऐश्वर्या रायचे मॉडलिंगचे किस्से सर्वांनी ऐकले असतील मात्र कुणी माझी मिस वर्ल्डला रॅम्प वॉक करतानं पाहिलं नसणार हे मात्र नक्की आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी- बॉलिवूड अ भिनेत्री ऐश्वर्या राय मागच्या काही दिवसांपासून सिनेमांपासून लांबच आहे. जरी ती सिनेमात दिसत नसली तरी तिच्या सुंदरतेमुळे ती नेहमी चर्चेत असते. ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब नावावर केल्यानंतर तिनं तिचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला. ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जीवावर वेगळी ओळख मिळवली आहे. तिच्या अभिनयाइतकीच तिच्य सुंदरतेचीही चर्चा रंगलेली असते. ऐश्वर्या रायचे मॉडलिंगचे किस्से सर्वांनी ऐकले असतील मात्र कुणी माझी मिस वर्ल्डला रॅम्प वॉक करतानं पाहिलं नसणार हे मात्र नक्की आहे. असाच एक ऐश्वर्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे. विविध ड्रेसमध्ये तिचा वेगवेळा लूक पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतील स्विम सूट राउंडची देखील एक झलक पाहायला मिळत आहे. वाचा- तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्काराने करण्यात आलं सन्मानित 21 व्या वर्षी पटकावला होता मिस वर्ल्डचा किताब ऐश्वर्या रायने 19 नोव्हेंबर 1994 रोजी ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला होता. त्यावेळी ऐश्वर्या फक्त 21 वर्षांची होती. ऐश्वर्या रायशिवाय अनेक अभिनेत्रींनी ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला आहे. असं जरी असलं तरी आजही चर्चा होते ते फक्त आणि फक्त ऐश्वर्या रायच्य सौंदर्याची हेही तितकेच खरे आहे.

जाहिरात

मॉडेलिंग करिअरमध्ये यश मिळवल्यानंतर ऐश्वर्या रायने तिचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला. ऐश्वर्या रायने 1997 मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

News18लोकमत
News18लोकमत

याच वर्षी तिनं ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ऐश्वर्या रायने आपल्या करिअरमध्ये मागे वळून पाहिलं नाही. आज ती बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात