डॅशिंग पोलीस ऑफिसर बघायचाय? तर मग आयुष्यमानचा 'Article 15' पाहाच

डॅशिंग पोलीस ऑफिसर बघायचाय? तर मग आयुष्यमानचा  'Article 15' पाहाच

थ्रिलींग, सस्पेन्स असा सगळा मसला या चित्रपटात ठासून भरलाय. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आता जास्त ताणली जाणार नाही.

  • Share this:

मुंबई 11 जून :  आयुष्यमान खुरानाच्या 'Article 15'चं पोष्टर रिलीज झालं आणि सगळ्यांना उत्सुकता लागली ती या चित्रपटाची. या चित्रपटात आयुष्यमान एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या आधी बॉलिवूडमध्ये पोलिसांवरचे अनेक चित्रपट आले होते. मात्र या चित्रपटात त्याने पोलीस अधिकाऱ्याची जी भूमिका साकराली ती अतिशय वेगळी ठरणार आहे.

या आधी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका असलेला सिंबा हा चित्रपट चर्चेत आला होता. पण त्यातली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका जास्त 'फिल्मी' होती. एका बलात्कार प्रकरणाभोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली होती. मात्र आयुष्यमानचा 'Article 15' या चित्रपटाची कथा अतिशय वेगळी आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला त्याची ही भूमिका नक्की आवडेल असं म्हटलं जातंय.

आयुष्यमानने साकारलेली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका ही धाडसी असून सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी झगडणारा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारा अधिकारी आयुष्यमाने उभा केलाय. त्यामुळे हा अधिकारी सामान्यांना आपला वाटणारा आहे.

थ्रिलींग, अॅक्शन, सस्पेन्स असा सगळा मसला या चित्रपटात ठासून भरलाय. 'Article 15'चं पोष्टरचं एवढं थ्रिलिंग आहे की ते प्रेक्षकांना नक्कीच चित्रपटगृहात खेचून घेणारं आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आता जास्त ताणली जाणार नाही.

एका प्रकरणाच्या तापास कथेवर असलेल्या या चित्रपटात अनेक नाट्यमय वळणं आहेत. लंडन इथं होणार असलेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'Article 15'चा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आयुष्यमान पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.

या चित्रपटात इशा तलवार, एम नासीर, मनोज पहावा, सयानी गुप्ता, कुमूद मिश्रा आणि मोहोम्मद झीशान अय्युब या कलाकारांनीही उत्तम काम केलंय.

अनुभव सिन्हा हे या चित्रपटचा दिग्ददर्शक असून Benaras Media Works आणि झी स्टुडीओने चित्रपटाची निर्मिती केलीय.

First published: June 11, 2019, 9:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading