मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Varun Natasha Wedding: शाही लग्न सोहळ्यातील PHOTO VIRAL

Varun Natasha Wedding: शाही लग्न सोहळ्यातील PHOTO VIRAL

वरुण धवन आज त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नताशा लाईम लाईटपासून अनेकदा लांब असल्याचं दिसतं. पण तिचंही फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव आहे. (Photo Credit- @varundvn/Instagram)

वरुण धवन आज त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नताशा लाईम लाईटपासून अनेकदा लांब असल्याचं दिसतं. पण तिचंही फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव आहे. (Photo Credit- @varundvn/Instagram)

अलिबागच्या (Alibag) 'मॅन्शन हाऊस रिसॉर्ट' ( Mansion House Resort) या अलिशान ठिकाणी वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha dalal) एकमेकांसोबत विवाहबंधनात (marriage) अडकणार आहे. त्यांच्या लग्नातील एक एक फोटो आता समोर येत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 24 जानेवारी: बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) वरुण धवन (Varun Dhavan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) दोघं एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. वरुणने अलीकडील काही महिन्यांपर्यंत त्याच्या गर्लफ्रेन्डबाबत (Girlfriend) कोणालाही थांगपत्ता लागू दिला नव्हता. त्याने त्याचं खाजगीपण जपलं होतं. पण आज ते कायमचे एकमेकांचे होणार आहेत. अलिबागच्या 'मॅन्शन हाऊस रिसॉर्ट' या अलिशान ठिकाणी दोघं एकमेकांच्या विवाहबंधनात (marriage) अडकणार आहे. त्यांच्या लग्नातील एक एक फोटो आता समोर येताना दिसत आहे. वरुण आणि नताशा यांच्या मेंदी सोहळ्याचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लग्नाच्या वेन्यूचे काही फोटो समोर आले आहे. अतिशय अलिशान ठिकाणी हे लग्न पार पडत असून अनेक बॉलिवूडकरांनी या शाही लग्नाला हजेरी लावली आहे. विविध प्रकारच्या आकर्षक रोषनाईने या ठिकाणाची सजावट करण्यात आली आहे. याचे फोटो नुकतेच समोर आले असून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. हे ही वाचा-देशातील पहिला Garbage Cafe; प्लास्टिक आणा आणि मोफत करा ब्रेकफास्ट, लंच..डिनर
View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

नताशा गेल्या अनेक वर्षांपासून वरुण धवनची गर्लफ्रेन्ड असली तरी तिने लाईम लाईट पासून स्वतःला दूर ठेवलं होतं. नताशा आणि वरुण दोघं एकमेकांना अगदी शालेय जीवनापासून ओळखतात. तेव्हापासून जपलेल्या मैत्रीचं रुपांतर आता लग्नात होतं आहे. शाळेच्या दिवसांपासून नताशाने वरुणला नेहमीच साथ दिली, असं स्वतः वरुणने करण जोहर यांच्या चॅट शोमध्ये सांगितलं होतं.
वरुण धवनला तर आपण सर्वजण चांगलचं ओळखतो. पण नताशा दलाल कॅमेऱ्यासमोर फारशी येत नाही, त्यामुळे तिला फार कमी जण ओळखतात. नताशाने तिचं शिक्षण फॅशन डिझायनिंग क्षेत्रात पूर्ण केलं आहे. 2013 मध्ये नताशाने फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्कमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तिने डिझायनिंग क्षेत्रातच काम सुरू केलं आहे. तिचा स्वतः चा कपड्याचा एक ब्रँडही आहे, जो बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खूप पसंत केला जातो. 16 मार्च 1989 मध्ये मुंबईत नताशाचा जन्म झाला होता. नताशा दलालच्या वडीलांचं नाव राजेश दलाल असून ते एक व्यावसायिक आहेत.
First published:

Tags: Bollywood News, Marriage

पुढील बातम्या