देशातील पहिला Garbage Cafe; प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत करा ब्रेकफास्ट, लंच..डिनर

देशातील पहिला Garbage Cafe; प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत करा ब्रेकफास्ट, लंच..डिनर

एक किलो प्लास्टिकच्या कचऱ्यावर अर्धी किलो मिठाई मिळेल. तर 5 किलो प्लास्टिकच्या कचऱ्यावर एक किलो मिठाई मिळू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी : दक्षिण दिल्ली नगर निगमकडूम (SDMC) स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत (Swachh Bharat Abhiyan) अनोखा पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत प्लास्टिकच्या कचऱ्याच्या बदल्यात तुम्हाला चांगलं जेवायला मिळेल.  SDMC कडून द्वारकाच्या नजफगड झोन स्थित वर्धमान प्लस सिटी मॉलमध्ये डायमंड स्वीट्सने गारबेज कॅफे (Garbage cafe) सुरू केला आहे. येथे लोक प्लास्टिकच्या कचऱ्याच्या बदल्यात चांगलं अन्न खाऊ शकतात. या कॅफेमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याच्या बदल्यात लोक ब्रेक फास्ट, लंच आणि डिनर करू शकतात. याशिवाय लोक कचऱ्याच्या बदल्यात मिठाईचा देखील आस्वाद घेऊ शकतात.

एका रिपोर्टनुसार डेप्युटी कमिश्नर राधा कृष्णा यांनी सांगितलं की, अन्य दुकानदारांसोबतही बातचीत सुरू आहे. पहिल्या टप्प्यात डायमंड स्वीट्सच्या मालकाचं सहकार्य मिळालं आहे. या दुकानात मोहिमेचं एक स्लोगनदेखील जारी केलं आहे. 'Bring Waste Plastic From Your House And Get Free Meal' असं या दुकानात लिहिलं आहे.

हे ही वाचा-कोरोना काळा दिवस-रात्र झटली 'योद्धा'; लस घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी मृत्यू

सकाळ ते रात्री..कधीही आणा कचरा आणि करा लंच..डिनर

दुसरीकडे डायमंड स्वीट्सचे मालक पूजा शर्मा म्हणाल्या की, गारबेज कॅफे सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असतो. जे लोक सकाळी कचरा आणतील त्यांनी ब्रेक फास्ट आणि मिठाई मिळेल. तर दिवसाच्या वेळी आल्यास लंच आणि रात्रीच्या वेळी प्लास्टिक आणून दिल्यास डिनरची सुविधा देण्यात आली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, एक किलो प्लास्टिकच्या कचऱ्यावर अर्धी किलो मिठाई मिळेल. तर 5 किलो प्लास्टिकच्या कचऱ्यावर एक किलो मिठाई मिळू शकते.

Published by: Meenal Gangurde
First published: January 24, 2021, 8:50 PM IST

ताज्या बातम्या