जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रिअल हिरो; सोनू सूदच्या मदतीमुळे तो 12 वर्षांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला

रिअल हिरो; सोनू सूदच्या मदतीमुळे तो 12 वर्षांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला

रिअल हिरो; सोनू सूदच्या मदतीमुळे तो 12 वर्षांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला

अभिनेता सोनू सूदमुळेच (Sonu Sood) 12 वर्ष अंथरुणाला खिळून असलेला अमन स्वत:च्या पायावर उभा राहिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 डिसेंबर: सोनू सूद (Sonu Sood) सध्या त्याच्या समाजकार्यामुळे चर्चेत येत असतो. लॉकडाऊनमध्ये अनेक मजुरांना त्याने घरी पोहचवण्याची सोय केली. सोनू आजपर्यंत अनेक गरजू व्यक्तींच्या पाठिशी उभा राहिला आहे. गेल्या 12 वर्षांपासून स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अमन नावाच्या एका तरुणाला सोनूमुळे आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाली आहे. छत्तीसगड इथे राहणाऱ्या अमनला पायाच्या हाडाचं दुखणं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षांपासून तो स्वत:च्या पायावर उभं राहू शकत नव्हता. अमनचे वडील ड्रायव्हर आहेत. तर आई घरीच असते. त्यांच्याकडे स्वत:चं घरही नसल्यामुळे हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होतं. एकूणच घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अमनवर उचपार करणं त्याच्या कुटुंबाला शक्य होत नव्हतं. आजारामुळे गेली 12 वर्ष हा तरुण अंथरुणाला खिळून होता. सोनू सूदला त्याच्या आजाराबद्दल माहिती मिळाली असता त्याने अमनला मदत करण्याचं ठरवलं. अमनवर झाली शस्त्रक्रिया सोनू सूदने लवकरात लवकर अमनला त्याच्या त्रासातून मुक्त करण्याचा चंगच बांधला. त्याने न्यूरो सर्जन डॉ. अश्वनी यांची भेट घेतली. डॉक्टर अश्वनी हे प्रसिद्ध सर्जन असून त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 1 हजारापेक्षा रुग्णांवर उपचार केले आहेत. अमनची सर्जरीदेखील यशस्वी झाली असून तो आता स्वत:च्या पायावर उभा राहायला लागला आहे. सोनू सूदने केलेल्या मदतीमुळे एका तरुणाला आयुष्य जगण्याची उमेद मिळाली आहे. याआधीही सोनू अनेकांच्या पाठिशी देवासारखा उभा राहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात