मुंबई, 8 मे- 8 मे रोजी ‘रॉकी’ (Rocky) या चित्रपटाला तब्बल 40 वर्ष पूर्ण झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेता सुनील दत्त(Sunil Datt) आणि अभिनेत्री नर्गिस दत्त(Nargis) यांचा मुलगा संजय दत्तने(Sanjay Datt) बॉलीवूडमध्ये लीड रोलमध्ये पदार्पण केलं होतं. या निमित्ताने सोशल मीडियावर एक जुना फोटो व्हायरल होतं आहे. या फोटोमध्ये सुनील दत्त आणि संजय दत्त एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत. मात्र या दोघांच्या मध्ये असणारी एक रिकामी खुर्ची लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. पाहूया काय आहे हा नेमका किस्सा.
हा फोटो ‘रॉकी’ चित्रपटाच्या प्रिमियरचा आहे. या बापलेकांनी आपल्या मध्ये एक खुर्ची रिकामी सोडली होती आणि त्यापाठीमागे कारण देखील तितकचं भावुक करणार आहे. संजय दत्तचा पहिला चित्रपट पूर्ण होण्याआधीचा त्यांच्या आई नर्गिस दत्तनं जगाचा निरोप घेतला होता. त्यामुळे संजय दत्तने आपल्या आई साठी ती खुर्ची रिकामी ठेवली होती. त्यांचं असं म्हणनं होतं. की त्यांच्या पहिल्या चित्रपटाला आई त्याला आशिर्वाद द्यायला नक्की येणार.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस या 1980 मध्ये कॅन्सरने त्रस्त होत्या. त्यांचं आपल्या मुलावर खूप प्रेम होतं. त्यांची खूप इच्छा होती संजय दत्तचा पहिला चित्रपट रॉकी पाहता यावा. मात्र दुर्दैवानं त्यांची ही इच्छा इच्छाचं राहून गेली.
कारण ‘रॉकी’ चित्रपट रिलीज व्हायच्या फक्त काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. कॅन्सरग्रस्त नर्गिस यांनी 3 मे 1981 मध्ये जगाचा निरोप घेतला होता. सुनील दत्त आणि संजय दत्तसाठी हा काळ खुपचं कठीण होता.
View this post on Instagram
नुकताच संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नर्गिस यांच्या 40 व्या स्मृतिदिना निमित्त एक फोटो शेयर केला होता. आणि त्यासोबतचं लिहिलं होत. ‘माझ्या आयुष्यातील असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी मला तुझी आठवण आली नाही’. याआधी सुद्धा संजय दत्तने नर्गिस यांच्या स्मृतिदिना निमित्त फोटो शेयर केला होता.
(हे वाचा:‘भूकेने व्याकूळ होतो अन्..’; पाहा दिलीप कुमार यांच्या डायलॉगचं कोरोना कनेक्शन )
रॉकी चित्रपटात संजय दत्त सोबत टीना मुनीम, अमजद खान, राखी, शम्मी कपूर, रीना रॉय सारखे दिग्गज कलाकार होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.