मुंबई 8 मे**:** राज्यातील कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळं वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आरोग्य व्यवस्थेवर जाणवू लागला आहे. रुग्णालयात बेड, औषधं, लसी यांचा तुटवडा निर्माण झालाय. शिवाय लॉकडाउनमुळं हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळं सर्वत्र निराशेचं वातावरण आहे. ही संपूर्ण परिस्थिती सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार (dilip kumar) यांनी आपल्या एका डायलॉगमधून व्यक्त केली होती. कित्येक वर्षांपूर्वीचा तो डायलॉग सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार व्हायरल होत आहे. हा डायलॉग पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. दिलीप कुमार यांचा हा व्हिडीओ स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (kunal karma) यानं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या ब्कॅक अँड व्हाईट व्हिडीओत दिलीप कुमार यांनी एक प्रभावी डायलॉ उच्चारला आहे. हा डायलॉग कित्येक वर्ष जुना असला तरी यामध्ये त्यांनी सांगितलेली हुबेहुब परिस्थिती आज आपण कोरोनामुळं अनुभवतोय. “लोक भुकेने मरतायेत अन् आम्ही जास्त किंमतीत अन्न विकून स्वत:चे खिसे भरतोय. शहरात आजार पसरलाय अन् आम्ही औषधं चोरुन ती जास्त किंमतींना विकतोय. जेव्हा पोलीस चौकशीसाठी आले तेव्हा लोकांचे प्राण वाचवणारी औषधं आम्ही नाल्यामध्ये फेकून दिली.” असं संभाषण त्यांनी या व्हिडीओमध्ये केलं आहे. मल्लिका शेरावतमुळं बदललं अनुराग बासुचं आयुष्य; पाहा फ्लॉप दिग्दर्शक कसा झाला सुपरस्टार?
दिलीप कुमार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 60 हजारांपेक्षा पाहिला आहे. अन् जवळपास तितक्याच लोकांनी त्यावर गंमतीशीर कॉमेंट्स देखील केल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओचं कोरोना कनेक्शन जोडण्याचाही प्रयत्न केलाय.

)







