अभिनेत्री नूतनचं आईशी होता 20 वर्षं अबोला, बोल्ड मराठी सिनेतारका असलेल्या आईशी कशावरून झालं होतं भांडण?

अभिनेत्री नूतनचं आईशी होता 20 वर्षं अबोला, बोल्ड मराठी सिनेतारका असलेल्या आईशी कशावरून झालं होतं भांडण?

नूतन यांची आई शोभना समर्थ या मराठी चित्रपटसृष्टीतल्या बोल्ड अभिनेत्री म्हणून एके काळी गाजल्या होत्या. आई आणि मुलीमध्ये का निर्माण झाला होता दुरावा?

  • Share this:

मुंबई, 4 मे–  गतकाळातील नावाजलेली अभिनेत्री नूतन(Actress Nutan)  यांच्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा अजूनही अनेक रसिकांच्या मनांत ताज्या आहेत. नूतन यांचा अभिनय साधा सोपा आणि लाघवी होता. त्यांनी 40 वर्षांच्या करियरमध्ये (40 Years film career)  वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांनी देवआनंद(Devaanad), धर्मेंद्र(Dharmendra), दिलीप कुमार(Dilip Kumar), संजीव कुमार(Sanjeev kumar), अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) अशा दिग्गजांसोबत काम केलं. एवढ्या मोठ्या कारकीर्दित त्यांना 6 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याचबरोबर भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊनही गौरवलं. एका बाजूला हे यश असलं तरीही त्यांचं खासगी आयुष्य मात्र विरोधाभासांनी भरलं होतं. असं सांगितलं जातं की त्यांची आई अभिनेत्री शोभना समर्थ आणि नूतन यांच्या नात्यात खूप तणाव होता.

नूतनची आई म्हणजे नामवंत मराठी अभिनेत्री शोभना समर्थ. शोभना समर्थ यांनी एक काळ त्यांच्या बोल्ड भूमिकांनी गाजवला होता. स्वीमिंग सूट घालून शॉट देणाऱ्या पहिल्या मराठी अभिनेत्री असं शोभना समर्थ यांच्याबद्दल बोललं जातं. त्यांच्या दोन्ही मुली - नूतन आणि तनुजा हिंदी चित्रपटसृष्टीत चांगल्याच स्थिरावल्या. पण नूतन आणि आई शोभना समर्थ यांचं अनेक काळ एकमेकींशी पटत नव्हतं असं म्हणतात. काय होतं त्यामागचं कारण?

पैशांच्या अफरातफरी संबंधी एकदा झालेल्या भांडणानंतर या मायलेकी परस्परांशी 20 वर्षं बोलल्या नव्हत्या.

या दोघींच्या अबोल्याला ही घटना कारणीभूत ठरली होती. एकदा इन्कम टॅक्स विभागातून थकबाकी भरण्यासंबंधीचं पत्र नूतन यांना आलं. शोभना यांनी नूतनला सांगितलं की तो कर भरून टाक. पण नूतन त्या कंपनीत 30 टक्के पार्टनर होत्या. आणि त्यांची आई त्यांना कंपनीचा पूर्ण कर भरायला सांगत होती. कराची रक्कम खूपच जास्त होती त्यामुळे नूतन त्यांच्या आईला म्हणाल्या,‘माझी सगळी कमाई या कंपनीतच वापरली जाते पण माझा जेवढा वाटा आहे तेवढा कर मी भरायला तयार आहे. तू मला सगळा कर भरायला सांगते आहेस हे चुकीचं आहे.’बास या कारणावरून या दोघी मायलेकींचं भांडण झालं आणि नंतर तब्बल 20 वर्षं त्या एकमेकींशी बोलल्या नाहीत.

(हे वाचा:मीनाक्षी शेषाद्रींच्या निधनाच्या अफवांना पूर्णविराम; अभिनेत्रीने दिली माहिती  )

नूतन यांनी नौदल ऑफिसर रजनीश बहल यांच्याशी लग्न केलं आणि आता चित्रपटांत का करणार नाही असं जाहीर केलं. पण मुलगा मोहनीश बहल याच्या जन्मानंतरही त्यांना एकापेक्षा एक उत्तम भूमिका मिळत राहिल्या त्यामुळे नूतन यांनी पुन्हा चित्रपटांत काम करायला सुरूवात केली. 1959 मध्ये आलेल्या सुजाता (Sujata) चित्रपटाने नूतन यांच्या करिअरला उंची गाठून दिली. यातल्या अस्पृश्य मुलीची भूमिका नूतन यांनी अशा पद्धतीने साकारली होती की तिनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजही लोक त्या भूमिकेची आठवण काढतात.

First published: May 4, 2021, 7:17 PM IST

ताज्या बातम्या