जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सैफ अली खान बनणार 'वैज्ञानिक', साकारणार जहाँगीर होमी भाभा यांची भूमिका

सैफ अली खान बनणार 'वैज्ञानिक', साकारणार जहाँगीर होमी भाभा यांची भूमिका

सैफ अली खान बनणार 'वैज्ञानिक', साकारणार जहाँगीर होमी भाभा यांची भूमिका

सैफ वैज्ञानिक (Scientist) जहाँगीर होमी भाभा (Jahangir Homi Bhabha) यांच्या आयुष्यावर तयार होणाऱ्या चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट 1960 होमी भाभा यांच्या झालेल्या रहस्यमयी मृत्यूवर आधारित असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल: बॉलीवूड नवाब (Bollywood Navab)  म्हणून अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan)  ओळखलं जातं. सैफने आजपर्यंत अनेक चित्रपटांत काम केलं आहे. मात्र सध्या सैफ आपल्या धाटणी पासून वेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ वैज्ञानिक (Scientist) जहाँगीर होमी भाभा (Jahangir Homi Bhabha) यांच्या आयुष्यावर तयार होणाऱ्या चित्रपटात काम करणार आहे. सैफ स्वतः जहाँगीर होमी भाभा यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 1960 होमी भाभा यांच्या झालेल्या रहस्यमयी मृत्यूवर आधारित असणार आहे.

जाहिरात

रिलायन्स एन्टरटेनमेंटने याचं नाव ‘असेसिएशन ऑफ भाभा’ असं दिलं आहे. सैफने या चित्रपटासाठी होकार कळवल्यानंतर आता बाकीच्या पात्रांचा देखील विचार केला जात असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये भाभा यांच्या सुरक्षारक्षक एजन्सीमधील अंगरक्षक पात्राचा देखील समावेश आहे. जहांगीर होमी भाभा हे प्रतिष्ठित वैज्ञानिकांपैकी एक होते. असं म्हटलं जातं, की त्यांचा मृत्यू एका विमान दुर्घटनेमध्ये झाला होता, मात्र त्याचं सत्य कधीचं समोर आलं नाही. त्यामुळे अशी अपेक्षा केली जात आहे, की या चित्रपटामुळे तरी भाभा यांच्या आयुष्यातील अनेक रहस्यमयी गोष्टी समोर येतील. (हे वाचा: कार्तिक आर्यनने सार्वजनिक ठिकाणी ‘हा’ स्टंट करण्यास केली मनाई, काय आहे कारण? ) सैफ आपल्या ‘तांडव’ या वेबसीरीजमुळे मोठा चर्चेत आला होता. त्याचबरोबर सैफने तान्हाजी सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. तसंच लाल कप्तान हासुद्धा त्याचा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस आला होता. आगामी काळात सैफ आदिपुरुष, भूत पोलीस, आणि विक्रम वेधाच्या रिमेकमध्ये दिसून येणार आहे. सैफ अली खान या चित्रपटांबाबत उत्सुक असून, प्रेक्षकांनाकडून या चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात