मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'..तेव्हा 2च रुपयांचा पास माझ्या खिशाला परवडत होता';अमिताभ यांना आठवले ते दिवस

'..तेव्हा 2च रुपयांचा पास माझ्या खिशाला परवडत होता';अमिताभ यांना आठवले ते दिवस

सध्या सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'कौन बनेगा करोडपती'(Kaun Banega Crorepati 13) या कार्यक्रमाचा तेरावा सिझन सुरू आहे. बॉलिवुडचे मेगास्टार अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हा शो होस्ट करतात.

सध्या सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'कौन बनेगा करोडपती'(Kaun Banega Crorepati 13) या कार्यक्रमाचा तेरावा सिझन सुरू आहे. बॉलिवुडचे मेगास्टार अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हा शो होस्ट करतात.

सध्या सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'कौन बनेगा करोडपती'(Kaun Banega Crorepati 13) या कार्यक्रमाचा तेरावा सिझन सुरू आहे. बॉलिवुडचे मेगास्टार अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हा शो होस्ट करतात.

    मुंबई, 20 ऑक्टोबर:  सध्या सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'कौन बनेगा करोडपती'(Kaun Banega Crorepati 13) या कार्यक्रमाचा तेरावा सिझन सुरू आहे. बॉलिवुडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हा शो होस्ट करतात. शो होस्ट करत असताना अमिताभ स्पर्धकांसोबत विविध विषयांवर गप्पा देखील मारत असतात. या दरम्यान अनेकदा ते आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात.

    आतापर्यंत त्यांनी वेळोवेळी अनेक आठवणी स्पर्धक आणि प्रेक्षकांना सांगितल्या आहेत. आता पुन्हा एका स्पर्धकाला विचारलेल्या प्रश्नाचं निमित्त साधून बिग बींनी कोलकात्यातील (Kolkata) आठवणींना उजाळा दिला. सोबतच त्यांनी आपल्या त्यावेळच्या नाजूक आर्थिक परिस्थितीबद्दल देखील प्रेक्षकांना सांगितलं. टाइम्स नाऊ न्यजूनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    सोमवारपासून (१८ ऑक्टोबर) केबीसीमध्ये नवीन आठवड्याचा खेळ सुरू करण्यात आला. प्रेक्षकांना या आठवड्यातील स्पर्धकांच्या नवीन गटाची ओळख करून देण्यात आली. गृहिणी असलेल्या महाराष्ट्रातील भाग्यश्री तायडे या हॉटसीटवर बसणाऱ्या या आठवड्यातील पहिल्या स्पर्धक ठरल्या. त्यांनी अप्रतिम खेळ करत 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. त्यांच्यानंतर मोहित कुमार जोशी हॉटसीटवर बसले. प्रश्नोत्तरादरम्यान बिग बींनी मोहित कुमारला कोलकात्यातील ट्रामबद्दल (tram) एक व्हिज्युअल स्वरुपाचा प्रश्न विचारला. मोहित कुमार यांनी प्रश्नाचं बरोबर उत्तर दिल्यानंतर बिग बींनी ट्रामशी निगडित असलेल्या आपल्या तरुणपणातील आठवणींना उजाळा दिला.

    अमिताभ बच्चन यांना सर्वांत पहिली नोकरी कोलकाता शहरात मिळाली होती. त्यावेळी ते आणि त्यांचे मित्र प्रवासासाठी गर्दीनं खचाखच भरलेल्या ट्रामचा वापर करत. त्यावेळी ट्राम प्रवासासाठी दोन रुपयांचा पास मिळत असे. दोन रुपयांच्या पासवर तुम्हाला शहरभर कुठेही प्रवास करता येत असे, अशी आठवण बिग बींनी सांगितली. ट्राममध्ये गर्दी असायची मात्र, काय करणार त्यावेळी ट्रामचा दोन रुपयांचा पासच खिशाला परवडणारा होता, असा विनोददेखील बिग बींनी केला.

    (हे वाचा:DDLJ: 'राज-सिमरन'च्या केमिस्ट्रीची 26 वर्षे पूर्ण!सैफला मिळाली होती ऑफर)

    केबीसीचा तेरावा सिझन सध्या लोकप्रिय झाला आहे. या सिझनमध्ये निर्मात्यांनी प्रेक्षकांची पोल लाईफलाईन सुविधा देखील परत आणली आहे. मागील सिझनमध्ये कोविड -19मुळे ही सुविधा बंद करण्यात आली होती. याशिवाय, स्पर्धकांना 50-50, एक्सपर्ट अॅडव्हाइस आणि क्वेश्चन फ्लिप अशा आणखी तीन लाइफलाइन देखील मिळत आहेत. शोचा एक नवीन प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे. त्यामध्ये एक स्पर्धक एक कोटी रुपये जिंकल्याचं आणि त्यानंतर तो सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची तयारी करत असल्याचं देखील दाखवण्यात आलं आहे.या नवीन प्रोमोनं प्रेक्षकांच्या मनात केबीसीच्या येणाऱ्या भागांविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण करण्याच काम केलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Amitabh Bachchan, KBC, Kolkata