जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / हेलिकॉप्टरमध्ये अचानक Bear Gryll ला किस करु लागला रणवीर सिंह; त्यांनतर जे घडलं,पाहा VIDEO

हेलिकॉप्टरमध्ये अचानक Bear Gryll ला किस करु लागला रणवीर सिंह; त्यांनतर जे घडलं,पाहा VIDEO

हेलिकॉप्टरमध्ये अचानक Bear Gryll ला किस करु लागला रणवीर सिंह; त्यांनतर जे घडलं,पाहा VIDEO

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) नेहमीच प्रचंड ऍक्टिव्ह असतो. तो प्रत्येक गोष्ट आपल्या हटके आणि मजेशीर स्टाईलने करत असतो. रणवीर सिंहची स्टाइलच वेगळी आहे. तो जे काही करतो ते नेहमीच मजेदार आणि मनोरंजक असतं. अभिनेता नुकतंच ‘रणवीर वर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ मध्ये (Ranveer vs Wild With Bear Grylls) दिसला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जुलै-  बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) नेहमीच प्रचंड ऍक्टिव्ह असतो. तो प्रत्येक गोष्ट आपल्या हटके आणि मजेशीर स्टाईलने करत असतो. रणवीर सिंहची स्टाइलच वेगळी आहे. तो जे काही करतो ते नेहमीच मजेदार आणि मनोरंजक असतं. अभिनेता नुकतंच ‘रणवीर वर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ मध्ये  (Ranveer vs Wild With Bear Grylls)  दिसला होता. OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम झालेल्या या विशेष एपिसोडमध्ये रणवीर सिंह बेअर ग्रिल्ससोबत (Bear Grylls) जंगलात फिरताना दिसला. रणवीर सिंह या शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोमधील रणवीर सिंह आणि बेयर ग्रीलचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. बेयर ग्रिल्सचा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. या शोमध्ये सध्या एकापेक्षा एक भरतीय कलाकार सहभागी होताना दिसून येत आहेत. अभिनेता सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमार, विकी कौशलनंतर आता अभिनेता रणवीर सिंह यामध्ये झळकला आहे. ‘रणवीर वर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या शोचा नवा एपिसोड नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्यात आला आहे. त्यांनतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रणवीर सिंहला प्रचंड ट्रोलही केलं जात आहे. अनेक यूजर्सनी अभिनेत्याला टार्गेट केलं आहे. काय आहे त्यामागचं कारण तुम्हीच पाहा.

जाहिरात

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीर सिंह नेहमीप्रमाणेच त्याच्या दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. सोबतच अभिनेता बेअर ग्रिल्सचे कौतुक करताना दिसत आहे. रणवीर बेअरला म्हणत आहे- ‘पप्पी घेणार तुझी.’ त्यांनतर रणवीर खरंच बेअर ग्रिल्सला अनेकवेळा गालावर किस केलं. बेअर ग्रिल्स आणि रणवीर सिंहचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.अभिनेत्याच्या या हटके अंदाजाचं काही लोक जोरदार कौतुक करत आहेत तर काही लोक टीका करत आहेत. **(हे वाचा:** Ranveer Singh: ‘या’ ठिकाणी झालं रणवीरच्या बर्थ डेचं जंगी सेलिब्रेशन; दीपिकानं शेअर केले खास फोटो ) ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत एका यूजरने लिहिलंय - ‘हा आमचा मुलगा असूच शकत नाही.’ दुसऱ्याने लिहिलंय - ‘बेअर ग्रिल्स याआधी कधीच इतका घाबरला नसेल.’ तर काहींनी ट्रोल करत लिहलंय, ‘हे रणवीरला काय झालंय?’, बेयर किती अस्वस्थ वाटत आहे’. या व्हिडिओवर रणवीरला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात