मुंबई, 3 एप्रिल: जेनेलिया आणि रितेश देशमुख हे दाम्पत्य कायम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतं. सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ पोस्ट करून नेटकऱ्यांचं मनोरंजन करत असतात. त्यामुळे या दोघांचे चाहते त्यांच्या नव्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. आता जेनेलियाने पोस्ट केलेला एका व्हि़डिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जेनेलिया कांची कौलसोबत मज्जा करताना दिसत आहे. जेनेलियाच्या हाताला प्लास्टर असूनही ती मस्तीच्या मूडमध्ये आहे. जेनेलिया आणि कांची कौलचा व्हिडिओ रितेश देशमुखने शूट केला आहे. यासाठी जेनेलियाने कमेंट बॉक्समध्ये रितेशला टॅग करत आभारही व्यक्त केले आहेत.
या व्हिडिओत जेनेलिया इंग्रजी गाण्यावर थिकरताना दिसत आहे. हाताची काळजी घेत तिने डान्स केला आहे. नेटकरीही जेनेलियाच्या व्हिडिओला पसंती देत आहे. तसेच तिला काळजी घेण्याचा सल्लाही देत आहे.
जेनेलिया काही दिवसांपूर्वी स्केटिंग शिकत असताना पडली होती. त्यामुळे तिच्या हाताला दुखापत झाली होती. स्केटिंग करताना पडल्याचा व्हिडिओही जेनेलियाने सोशल मीडियावर शेअर केला होता. मुलांसोबत स्केटिंग शिकताना पडली आणि दुखापत झाल्याचं तिने सांगितलं होतं.
सारा अली खाननं निया शर्माला केलं कॉपी? तुम्हीच ठरवा कोण दिसतंय अधिक सुंदरजेनेलिया आणि रितेश यांनी 2003 साली ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होते. त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री जमली आणि नंतर दोघांमध्ये प्रेम झालं. दोघांनी 2012 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेनेलिया आणि रितेश यांना रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत,