मुंबई 19 जुलै: पुष्पा या सिनेमाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली होती. अल्लू अर्जुन रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने तुफान कामगिरी करत 2021 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं. सध्या या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चर्चा होत असून यामध्ये एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागल्याचं समजत आहे. बॉलिवूड स्टार आणि फॅमिली मॅन सिरीजमधून नाव कमावलेला अभिनेता मनोज बाजपेयीची पुष्पा सिनेमाच्या दुसऱ्या भागात एंट्री होणार असल्याचं समोर येत आहे. या सिनेमामध्ये तो एका पोलीस ऑफिसरची भूमिका करू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुष्पा सिनेमाला तिसऱ्या भागात जोडायचं काम मनोज करणार असल्याचं समजत आहे. पुष्पाची गोष्ट उत्तर भारताशी जोडण्याचं काम मनोज यांचं पात्र करू शकतं असं सांगितलं जात आहे. मंजोय यांच्या अभिनयकौशल्याची चर्चा सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे आता अल्लू अर्जुनसोबत मनोजला स्क्रीन शेअर करताना बघण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
पुष्प या सिनेमाने रिलीजनंतर ओटीटीवर सुद्धा काहीच दिवसात पदार्पण केलं होतं. असं असूनही या सिनेमाने लक्षणीय कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. पुष्पा या सिनेमाने रेकॉर्डतोड कमाई केल्याचं सुद्धा बघायला मिळालं होतं. पुष्पा सिनेमाच्या पहिल्या भागाने सिनेमाचा एक वेगळाच चाहतावर्ग तयार केल्याने दुसऱ्या भागात काय बघायला मिळणार याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होत. हे ही वाचा Amruta Subhash: …आणि अनुप सोनी यांनी खाडकन थोबाडीत मारली; अमृताने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा तसंच फहाद फासील हा साऊथचा अभिनेता सुद्धा पहिल्या भागात भाव खाऊन गेला होता. हा अभिनेता सुद्धा दुसऱ्या आणि त्याचसोबत पुष्पा च्या तिसऱ्या भागात सुद्धा बघायला मिळणार आहे. एका मुलाखतीत फहादने याबद्दल सांगितलं, “सुक्कू सर माझ्याकडे फिल्मसाठी विचारणा करायला आले तेव्हा हा एकच सिनेमा होता. त्यात माझा पोलीस स्टेशनचा भाग मध्यंतरानंतर होता. त्यानंतर याचं दोन सिनेमात रूपांतर झालं. आणि आता सरांनी तिसऱ्या भागासाठी तयार राहा,बरंच मटेरियल माझ्याकडे आहे असं सांगितलं.”
#FahadhFaasil : "When Sukku sir first told me the story, #Pushpa was only in one film, after the police station scene and my part in the second half, then it became two parts.Recently when he talked to me, he said be prepared for #Pushpa3 because he had enough materials to do it" pic.twitter.com/WQCSlagcz0
— Thyview (@Thyview) July 19, 2022
अल्लू अर्जुनच्या दमदार कामगिरीने या चित्रपटाला आधीच एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आता यामध्ये फॅमिली मॅन मनोजची एंट्री झाल्यावर नेमका काय धमाका होतो हे पाहायला चाहते उत्सुक झाले आहेत.