मुंबई, 10 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये (Bollywood) मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे नावं खूप लोकप्रिय झालं आहे. आपल्या दमदार भूमिकांबरोबरच शानदार अभिनयासाठी देखील तो ओळखला जातो. आपल्या भूमिकेमध्ये जीव ओतण्यासाठी मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या मोठी मेहनत घेत असून आगामी सिनेमासाठी तो काही दिवसांसाठी या दुनियेपासून वेगळा झाला आहे.
आपल्या दमदार अभिनयाबरोबरच अतिशय शांत म्हणून देखील तो परिचित आहे. बॉलिवूडमध्ये काम करताना त्याला 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. डायरेक्टर कनु बहल (Kanu Bahal) यांनी आगामी प्रोजेक्ट्साठी वर्कशॉपचं ( Workshop) आयोजन केलं आहे. यामुळे मनोज वाजपेयीने बाहेरील जगाशी संपर्क तोडला असून पूर्णपणे वर्कशॉपमध्ये लक्ष घातलं आहे. चित्रपटाच्या संपूर्ण कास्टबरोबर 15 दिवसांसाठी तो अंडरग्राउंड झाला असून जवळपास 50 दिवस त्याचा बाहेरील जगाशी संपर्क होणार नाही.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते नीरज पांडे (Neeraj Pandey) यांनी सीक्रेट्स ऑफ सनौली- डिस्कवरी ऑफ द सेंचुरी या डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली आहे. यात मनोज वाजपेयीने सूत्रधाराची भूमिका साकारली आहे. दरम्यान, आगामी काळात मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) 'डायल 100' या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच त्याचा 'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट येऊन गेला. याचबरोबर आगामी काळात त्याची वेब सीरीज 'फॅमिली मॅन'चा दुसरा भागही (The Family Man 2) येणार आहे. मनोज वाजपेयीने आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून जुबेदा आणि पिंजर यांसारख्या पिरिअड चित्रपटांमध्ये त्याने केलेल्या भूमिकेचं आजदेखील कौतुक होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Star celebraties