मुंबई 24 मे: आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कामाप्रती प्रचंड प्रामाणिक आहेत. ते करत असलेलं काम चांगलं व्हावं, यासाठी ते मेहनत घेतात. त्यांच्या वेळ पाळण्यापासून ते कोणताही रोल जीव ओतून करण्यापर्यंत त्यांचे बरेच किस्से तुम्ही ऐकले असतील. असाच त्यांच्या कामाबद्दल असलेली निष्ठा सांगणारा एक किस्सा आज आम्ही तुमच्यासाठी आणलाय. हा किस्सा त्यांच्या याराना चित्रपटाबद्दल आहे. 1981मध्ये आलेला त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. ‘याराना’ चित्रपटातील ‘छू कर मेरे मन को’ हे गाणं ऐकल्यानंतर अमिताभ चिडले होते. याबद्दलचा किस्सा म्युझिक कंपोझर राजेश रोशन (music composer rajesh roshan) यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. ‘तुझ्यामुळं मुस्लीम स्त्रियांचं नाव खराब होतं’; अंजुम फकीह बिकिनी फोटोंमुळं होतेय ट्रोल म्युझिक कंपोझर राजेश रोशन सांगतात, 1970-80 च्या दशकात जेव्हा अमिताभ यांच्या चित्रपटाची गाणी बनत तेव्हा ते स्वतः म्युझिक स्टुडिओत हजर राहायचे. ‘याराना’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी चित्रपटाचं शुटिंग केल्यानंतर ते रेकॉर्डिंग स्टुडिओत यायचे. मात्र, जेव्हा ‘छू कर मेरे मन को’ गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा ते शुटिंगसाठी कोलकात्यात होते. तिथेच त्यांनी हे गाणं ऐकलेलं. हे गाणं ऐकल्यानंतर मला अमिताभ यांची बोलणी खावी लागली होती. हे गाणं खूप फास्ट झालंय आणि हे ते शूट करू शकणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी त्यांना म्हटलं, की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे गाण शूट करा. यावेळी फोनवर बोलतानाही अमिताभ यांचा राग मला जाणवत होता. मात्र, तरीही त्यांनी गाणं शूट केलं. त्यांना वाटलं असतं तर त्यांनी दिग्दर्शक राकेश कुमार आणि म्युझिक डायरेक्टर यांना सांगून गाणं बदलून घेतलं असतं. पण त्यांनी तसं नाही केलं. किशोर कुमार यांनी हे गाणं इतकं अप्रतिम गायलंय, की ते कधीच विसरलं जाऊ शकत नाही, असंही राजेश रोशन म्हणाले. ‘त्या दिवशी हृतिकमुळं मी मरणारच होतो’; अभय देओलनं सांगितला जीवघेण्या अपघाताचा थरारक अनुभव अमिताभ आणि रेखा (Rekha) अभिनीत ‘मिस्टर नटवरलाल’ चित्रपटातील ‘परदेसिया’ गाण्याचे म्युझिक कंपोझरही राजेश रोशन होते. यावेळी अमिताभ यांनी कशा पद्धतीने लता मंगेशकर यांना पर्वतांमध्ये शूट करण्यासाठी गाणं गायला लावलं, याबद्दलची एक आठवण सांगितली. राजेश म्हणाले, या गाण्याच्या वेळी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) जसं आम्हाला हवं होतं तसं हे गाणं गात नव्हत्या, मी गेलो आणि त्यांच्या पायाजवळ बसलो आणि त्यांना म्हटलं, की समजा तु्म्ही एका खोऱ्यात आहात आणि एखादी तिथली मुलगी ही गाणं गातीए. त्यानंतर त्यांनी हे गाणं अत्यंत सुंदर गायलं. त्यानंतरही अनेकदा अमिताभ स्टुडिओत यायचे आणि किशोर कुमार यांना म्हणायचे, की राजेश रोशन यांनी चांगलं म्युझिक दिलंय तर तुम्हाला गाणंही चांगलंच गावं लागेल. किशोर कुमार कसं गातात हे देखील अमिताभ सांगायचे. मला आश्चर्य वाटायचं, की एवढा मोठा हिरो इथं सतत का येतो कारण त्यांच्या येण्याने मला दडपण यायचं आणि मी नीट काम करू शकत नव्हतो, असंही राजेश यांनी सांगितलं. दरम्यान, म्युझिक कंपोझर राजेश रोशन यांचा आज 66वा वाढदिवस आहे. त्यांनी क्रिश, काबील, कहो ना प्यार है, त्रिशक्ती, लावारिस, कोयला, चिराग, याराना, सन्नाटा सारख्या अनेक चित्रपटात सदाबहार गाणी दिली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.