Home /News /entertainment /

जॉन अब्राहमचं Insta अकाउंट हॅक? Delet झाल्या सर्व पोस्ट

जॉन अब्राहमचं Insta अकाउंट हॅक? Delet झाल्या सर्व पोस्ट

'सत्यमेव जयते 2' या चित्रपटातून धमाल उडवणारा अभिनेता जॉन अब्राहमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अचानक सर्व पोस्ट डिलीट झाल्या आहेत.

    जॉन अब्राहमचं Insta अकाउंट हॅक, Delet झाल्या सर्व पोस्टमुंबई, 14 डिसेंबर - 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटातून धमाल उडवणारा अभिनेता जॉन अब्राहमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अचानक सर्व पोस्ट डिलीट झाल्या आहेत. त्यामुळे जॉनचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक  (john abraham instagram account hacked ) झाल्याची  चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. जॉनचे इन्स्टाग्राम वर 9 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पण असे काय झाले की जॉनला इन्स्टा पोस्ट डिलीट कराव्या लागली. त्याने त्याच्या सर्व पोस्ट स्वतःहून हटवल्या आहेत की त्याचे इन्स्टा अकाउंट हॅक झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कपिल शर्मा शोमध्ये हार्ट अटॅकबद्दल माहिती सांगितल्यामुळे जॉनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. खरंतर जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि रकुलप्रीत यांचा एक चित्रपट येतोय. ज्याचं नाव आहे 'अॅटॅक'. या सुपर सोल्जर चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद करणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी जॉनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सर्व पोस्ट डिलीट केल्याची चर्चा आहे. त्यामुळे जॉनकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही तोपर्यंत हे सर्व चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वाचा : कुणी इतकं सुंदर असतं का..कतरिना-विकीचं रोमँटिक फोटो पाहून प्रेमात बुडाल! जॉनचा वाढदिवस तीन दिवसावर आला आहे. 17 डिसेंबरला त्याचा वाढदिवस आहे. अशात अचानक त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील सर्व फोटो डिलिट झाल्यानं चाहत्यांनाही हे कशामुळं झालं असा प्रश्न पडला आहे. जॉनचं इन्स्टाग्रामवर अकाउंट हॅक झाल्याची चर्चा रंगली आहे. reason behind john abraham deleted insta posts जॉन अब्राहमने 2003 मध्ये जिस्म या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि साया, पाप, धूम, गरम मसाला, दोस्ताना, काबुल एक्सप्रेस, नो स्मोकिंग, न्यूयॉर्क, फोर्स, देसी बॉईज, हाउसफुल 2, मद्रास कॅफे, वेलकम बॅक यांसारखे चित्रपट केले.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, John abraham

    पुढील बातम्या