— Irrfan (@irrfank) March 16, 2018दरम्यान नेहमी रुटीन चेकअपसाठी इरफान कोकिलाबेन रुग्णालयात जातो. आताही त्याला तिथेच भरती करण्यात आले आहे. इरफान खानच्या प्रकृतीबाबत त्याच्या टीममधील प्रवक्त्याकडून आम्हाला अधिकृत प्रतिक्रिया अशी मिळाली आहे की, 'कोलन इन्फेक्शनमुळे (Colon infection) इरफान खान यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत आम्ही माहिती देत राहू. सध्या तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. त्याच्या सामर्थ्यामुळे आणि धैर्यामुळे तो आतापर्यंतची लढाई लढला आहे. आम्हाला खात्री आहे की त्याच्या प्रचंड इच्छाशक्तीने आणि सर्व हितचिंतकांच्या प्रार्थनांनी तो लवकरच या परिस्थितीतून बरा होईल.' इरफान त्याची पत्नी सुतापा सिकदरबरोबर मुंबईतच राहतो. त्यांना बाबिल आणि अयान अशी दोन मुलं देखील आहेत. हे सर्वजण आता त्याच्याबरोबर रुग्णालयात असल्याची माहिती मिळते आहे. (हे वाचा-'आयुष्यात खूप Ups & Downs आले पण...', सुशांतबरोबरच्या ब्रेकअपबद्दल बोलली अंकिता) दरम्यान 54 वर्षीय इरफान खानवर लंडनमध्ये उपचार सुरू होते. जवळपास वर्षभरापेक्षा जास्त वेळ त्याने या आजाराशी सामना केला आणि 2019 च्या सप्टेंबर महिन्यात इरफान भारतामध्ये परतला होता. परतल्यावर अगदी ताज्या दमाने त्याने 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा देखील केला. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने हा चित्रपट कमर्शिअली हिट ठरला नाही. मात्र इरफानच्या जिद्दीचं कौतुक मात्र झालं. संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.