मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'He Man' धर्मेंद्र यांनी अजून जपलीय आपली पहिली कार! किंमत ऐकून व्हाल थक्क

'He Man' धर्मेंद्र यांनी अजून जपलीय आपली पहिली कार! किंमत ऐकून व्हाल थक्क

अभिनेते धर्मेंद्र हे `रॉकी और रानी की प्रेम कहानी` या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री अलिया भट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) प्रमुख भुमिकेत आहेत.

अभिनेते धर्मेंद्र हे `रॉकी और रानी की प्रेम कहानी` या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री अलिया भट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) प्रमुख भुमिकेत आहेत.

अभिनेते धर्मेंद्र हे `रॉकी और रानी की प्रेम कहानी` या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री अलिया भट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) प्रमुख भुमिकेत आहेत.

  मुंबई, 12ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) हे दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. वयाच्या 85 व्या वर्षी देखील त्यांचा चाहतावर्ग कायम आहे. धर्मेंद्र हे चित्रपटसृष्टीपासून गेली काही काळ दूर असले तरी ते सोशल मीडियावर (Social Media) मात्र सक्रिय आहेत. अनेक प्रसंग, आठवणी आणि नाविन्यपूर्ण गोष्टी नेहमीच ते फोटो, व्हिडीओजच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. चाहते देखील धर्मेंद्र यांच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. नुकताच धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या पहिल्या कारविषयीच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या. या व्हिडीओत मेहंदी कलरच्या विंटेज फियाट कारचं (Fiat Car) दर्शन त्यांनी आपल्या चाहत्यांना घडवलं आहे.

  अभिनेते धर्मेंद्र हे `रॉकी और रानी की प्रेम कहानी` या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री अलिया भट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) प्रमुख भुमिकेत आहेत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्याही विशेष भूमिका आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होईल. शबाना आझमी यांच्यासोबत काम करण्यास मी खूप उत्सुक असल्याचं धर्मेंद्र सांगतात. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांनी शबाना आझमी यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. त्या फोटोखाली त्यांनी शबाना सोबतचं एक चित्र अपुर्णच राहिलं असं लिहिलं होतं. त्याबाबत धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांनी `बिच्छू` नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र सई परांजपे यांचा हा चित्रपट (Film) पूर्ण होऊ शकला नाही. मात्र आता हे दोघं `रॉकी और रानी की प्रेम कहानी` मध्ये एकत्र झळकणार आहेत.

  (हे वाचा:'डोनाल्ड डक' म्हणून मलायकाची उडवली खिल्ली! अभिनेत्रीचा तो VIDEO आहे चर्चेत)

  धर्मेंद्र हे त्यांचा बहुतांश वेळ फार्म हाऊसवर घालवतात. लोणावळ्यातील निर्सगरम्य वातावरणात असलेल्या फार्महाऊसमधून ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. फार्म हाउसमध्ये मजुरांसोबत काम करतानाचा एक व्हिडीओ त्यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. यावेळी ते मजुरांना सल्ला देखील देताना या व्हिडीओत दिसले होते. काही महिन्यांपूर्वी फार्म हाऊसमधील हिरवळीवर बसून मेथीच्या पराठ्याचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी पहिल्या कारच्या आठवणींचा व्हिडीओ हा त्यांच्या चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसून येतं.

  (हे वाचा:VIDEO: श्रिया सरन बनली आई;अभिनेत्रीने एका वर्षापूर्वीच दिलाय बाळाला जन्म,आता ...)

  या कारचा व्हिडीओ शेअर करताना धर्मेंद्र लिहितात, ``ही माझी पहिली कार होती. केवळ 18 हजार रुपयांना मी ही कार खरेदी केली होती. त्याकाळी 18 हजार रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. मी ही कार अजूनही जीवापड जपली आहे. ही कायम माझ्यासोबत राहावी, अशी दुवा करा``. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये धर्मेंद्र यांनी ``मित्रांनो, फियाट, माझी पहिली कार. माझं सर्वात आवडतं अपत्य. माझ्या मनाच्या अगदी जवळचं``. असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर सध्या या कारच्या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.

  First published:

  Tags: Dharmendra deol, Entertainment