मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'डोनाल्ड डक' म्हणून मलायकाची उडवली खिल्ली! अभिनेत्रीचा तो VIDEO आहे चर्चेत

'डोनाल्ड डक' म्हणून मलायकाची उडवली खिल्ली! अभिनेत्रीचा तो VIDEO आहे चर्चेत

मलायका अरोरा वयाच्या पन्नाशीत आहे. मात्र तिच्याकडे पाहून अनेकांना तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण होतं.

मलायका अरोरा वयाच्या पन्नाशीत आहे. मात्र तिच्याकडे पाहून अनेकांना तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण होतं.

मलायका अरोरा वयाच्या पन्नाशीत आहे. मात्र तिच्याकडे पाहून अनेकांना तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण होतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,12ऑक्टोबर- वयाच्या पन्नाशीतही नवख्या अभिनेत्रींना टक्कर देणारी मलायका अरोरा(Malaika Arora) नेहमीच चर्चेत असते. ती कधी आपल्या स्टाईलमुळे तर कधी रिलेशनशिपमुळे प्रकाशझोतात येत असते. अनेकवेळा ती ट्रोलदेखील होत असते. असंच काहीसं झालंय या व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. पाहूया काय आहे नेमका व्हिडीओ.

अभिनेत्री मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे तिची खिल्ली उडवली जात आहे. हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या अधिकृत मीडिया पेजवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा एका ठिकाणी स्पॉट करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये मलायका आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे. यावेळी तिने आपला रेग्युलर एक्सरसाइज सूट परिधान केला आहे. ती कारमधून उतरून थोडं पुढं येते आणि समोर असलेल्या पापाराझीं आणि कॅमेराला हात उंचावून पोझ देताना दिसते. यावेळी तिची चालण्याची स्टाईल अनेकांना खटकत असल्याचं दिसत आहेत. युजर्सनीं तिच्या चालण्याला फारच विचित्र म्हटलं आहे.

युजर्सनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स दिल्या आहेत. एकाने कमेंट् करत म्हटलं आहे, 'तुला चालण्यामध्ये काय अडचण आहे'. तर दुसर्याने म्हटलं आहे, 'कॅमेरा बघून तुझी चाल का बदलते'. तर आणखी एकाने कमेंट करत तुझी चाल बघून आपल्याला 'डोनाल्ड डकची आठवण आल्याचं म्हटलं आहे. अशा पद्धतीने या व्हिडीओवर मलायका अरोराला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. तिची खिल्ली उडवली जात आहे. मात्र ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही मलायका अरोराला ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र अभिनेत्री कधीच ट्रोल्स मनावर घेत नाही. ती नेहमीच आपल्या अंदाजात वावरताना दिसून येते.

(हे वाचा:फॉरेस्ट ग्रीन रंगाच्या साडीत खुललं Malaika Aroraचं सौंदर्य; साडीची किंमत ... )

मलायका अरोरा वयाच्या पन्नाशीत आहे. मात्र तिच्याकडे पाहून अनेकांना तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण होतं. कारण या वयातही ती अतिशय फिट आणि सुंदर आहे. अभिनेत्री आपला फिटनेस राखण्यासाठी बरीच मेहनत घेत असते. ती सतत जिमच्या बाहेर दिसून येते. मलायका अरोराला एक स्टायलिश अभिनेत्री म्हटलं जात. ती इंडियाज टॉप मॉडेल हा रिएलिटी शोदेखील जज करते. इतकंच नव्हे तर अनेक तरुणी तिला स्टाईल आयकॉन मानतात. तसेच तिच्या फॅशन सेन्स फॉलोदेखील करतात. सध्या अभिनेत्री अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांमध्ये वयाचं अंतर आहे. त्यामुळेसुद्धा ती बऱ्याचवेळा ट्रोल होत असते.

First published:

Tags: Entertainment, Malaika arora