मुंबई, 10 ऑगस्ट- बॉलिवूड
(Bollywood) अभिनेता अर्जुन कपूरने
(Arjun Kapoor) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये
(Tokyo Olympic) सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचं(
Neeraj Chopra) कौतुक करत त्याला देशाचा अभिमान असं म्हटलं आहे. नीरजवर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड कलाकरसुद्धा नीरजला शुभेच्छा देत आहेत. सध्या नीरज आपल्या एथलीटच्या जर्नीमुळे खूपच चर्चेत आहे. अभिनेता अर्जुन कपूरसुद्धा त्याच्या या प्रवासामुळे खूपच इन्स्पायर झाला आहे. नीरजने आपलं आणि देशाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे.
वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी नीरज चोप्राचं वजन 90 किलो झालं होतं. त्याला लट्ठपणाचा सामना करावा लागला होता. मात्र तरीसुद्धा नीरजने कधीचं धैर्य नाही गमावलं. त्याने ट्रान्सफोर्मेशन करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचं फळ आज आपल्या समोर आहे. नीरजच्या विजयाने आणि त्याच्या वेट लॉस जर्नीने अभिनेता अर्जुन कपूर खूपच इन्स्पायर झाला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्याने नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे.
(हे वाचा:
Javelin throw च्या नादात राखी सावंतने फोडलं एकाचं डोकं; रस्त्यावरच करत होती सराव)
अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘लट्ठपणा हा शारीरक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर करणारा असतो. नीरज चोप्राने फक्त आपल्या लट्ठपणालाचं हरवलं नाही, तर त्याने ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदकदेखील मिळवून दिलं. नीरज तू माझ्यासाठी आणि देशातील संपूर्ण देशासाठी एक प्रेरणा आहेस’. अर्जुनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. तसेच युजर्स अर्जुनच्या पोस्टचं कौतुकदेखील करत आहेत.
(हे वाचा:
बीचवर एन्जॉय तर एअरपोर्टवर नमाज पठण; सना खानचे मालदिव व्हेकेशनचे PHOTO VIRAL)
आपल्या सर्वांनाचं माहिती आहे की, बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरसुद्धा खुपचं लट्ठ होता. त्याचं वजन जवळजवळ 150 किलोपर्यंत पोहोचलं होतं. मात्र बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी त्याने आपलं ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. त्याने मोठ्या प्रमाणात आपलं वजन कमी करत फिट बॉडी मिळवली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.