पूर्व अभिनेत्री सना खान नुकतीच मालदिवला गेली आहे. त्याचे फोटोही तिने शेअर केले होते. तर या दरम्यानही तिने आपला नियम न मोडता एअरपौर्टवरच नमाज पढली. तर आता सना मालदिवमध्ये असून व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. सनाने मागील वर्षी विवाह केला होता. सनाने पती अनस सैय्यदसोबत नमाज अदा केली होती. पतीसोबच ती टेबल टेनिस खेळताना दिसत आहे. सना सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. अनेक फोटो शेअर करते. लग्नापूर्वीच काही दिवस सनाने सिनेसृष्टीला कायमचा रामराम केला होता. सनाने काही चित्रपटांत आणि मालिकांतही काम केलं होतं.