मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अरबाज खानने घटस्फोटीत पत्नी मलायकाला दिलं Special Gift; अभिनेत्रीनं केला व्हिडिओ शेअर

अरबाज खानने घटस्फोटीत पत्नी मलायकाला दिलं Special Gift; अभिनेत्रीनं केला व्हिडिओ शेअर

Gift from Arbaaz Khan: मलायकाला (Malaika Arora) तिच्या घटस्फोटीत नवऱ्याकडून एक खास गिफ्ट (Special Gift) मिळालं आहे, याचा व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत अपलोड केला आहे.

Gift from Arbaaz Khan: मलायकाला (Malaika Arora) तिच्या घटस्फोटीत नवऱ्याकडून एक खास गिफ्ट (Special Gift) मिळालं आहे, याचा व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत अपलोड केला आहे.

Gift from Arbaaz Khan: मलायकाला (Malaika Arora) तिच्या घटस्फोटीत नवऱ्याकडून एक खास गिफ्ट (Special Gift) मिळालं आहे, याचा व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत अपलोड केला आहे.

मुंबई, 24 मार्च: बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ( Malaika Arora) सोशल मीडियावर खूपचं सक्रिय असते. मलायका सोशल मीडियावर आपले फिटनेसचे व्हिडीओ (Fitness Video) शेअर करत असते. यासोबतचं ती सहलीच्या पोस्ट पासून कुकींग व्हिडीओही शेअर करत असते. यावेळी तिला एक खास गिफ्ट (Special Gift) मिळालं आहे, याचा फोटो मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत अपलोड केला आहे. खरंतर हे गिफ्ट तिला तिच्या घटस्फोटीत पतीनं अर्थातच अरबाज खाननं (Ex husband Arbaaz Khan) दिलं आहे. अरबाज खाननं दिलेलं हे गिफ्ट पाहून मलायकालाही फार आनंद झाला आहे. हे गिफ्ट उघडतानाचा एक व्हिडीओ मलायकानं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होतं आहे.

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आंब्याचा बॉक्स उघडताना दिसत आहे. अरबाज खाननं तिला हा आंब्याचं बॉक्स गिफ्ट म्हणून पाठवला आहे. मलायकानं या गिफ्टबाबत सांगताना लिहिलं की, 'आंब्यांसाठी खूप धन्यवाद अरबाज.' यावेळी तिने या पोस्टमध्ये आणखी एका अकाऊंटला टॅग केलं असून याठिकाणाहून तुम्ही आंबे ऑनलाइन ऑर्डर करू शकता, असं म्हटलं आहे. अरबाजनं ही भेट केवळ मलायकालाच पाठवली नाही, तर तिची बहीण अमृता अरोरालाही पाठवली आहे.

खरंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्यात घटस्फोट झाला आहे. 2017 मध्ये त्यांनी दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर दोघंही आपापल्या आयुष्यात पुढं गेले आहेत. पण दोघांच्या घटस्फोटामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. त्यांच्या दोघांत वादाला सुरुवात झाल्यानंतर दरम्यानच्या काळात अनेक अवफा पसरल्या होत्या.

हे ही वाचा - Malaika Arora : ओव्हर साईज शर्टमधील मलायकाच्या फोटोनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

मलायका अरोरा सध्या बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करताना दिसत आहे. मलायकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अर्जुन कपूरसोबतचे अनेक व्हिडीओज आणि फोटोज शेअर केले आहेत. त्याचबरोबर अर्जुनही अनेकदा मलायकाच्या कुटुंबीयांसोबत दिसला आहे. अलीकडेचं दोघांनी नवीन वर्ष एकत्र साजरं केलं होतं.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Malaika arora