मुंबई, 22 एप्रिल : बॉलीवूड अभिनेते (bollywood actor) अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची मैत्री (friendship) जगजाहीर जाहीर आहे. राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांनी नेहमीच एकमेकांच्या सुखदुखात साथ दिली आहे. राजीव गांधी यांच्या आई आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येनंतर राजीव गांधींनी आपल्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवला होता. आणि त्यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. राजीव गांधींनीचं अमिताभ यांना राजकारणात आणलं होतं. राजीव गांधी यांनी अमिताभ यांना 1986 मध्ये उत्तरप्रदेश मधील इलाहाबाद मतदार संघाचं तिकीट दिलं होतं. तेथून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होऊन गेलेल्या हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव करत अमिताभ संसदेत गेले होते. हेमवती यांचा पराभव करणं अशक्य असचं होतं. मात्र ते अमिताभ यांनी शक्य करून दाखवलं होतं. परंतु अमिताभ यांनी आपला संसदीय कार्यकाल पूर्ण केला नव्हता. त्यांनी अवघ्या 3 वर्षांच्या आत राजकारणाला रामराम ठोकला होता. अमिताभ राजकारण सोडून चित्रपटसृष्टीत परतले होते. तरीसुद्धा राजीव गांधीसोबत त्यांची मैत्री तशीच होती. त्यात कोणतंही अंतर आलेलं नव्हतं. 1989 मध्ये जेव्हा राजीव गांधींची हत्या झाली, तेव्हा अमिताभ लंडनमध्ये होते. ही बातमी ऐकून त्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर ते लगेच लंडनहून दिल्लीला परतले होते आणि प्रियांका गांधींसोबत मिळून राजीव गांधींच्या अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी उचलली होती. (वाचा: बँक कॅशियर ते एसीपी प्रद्युमन; अभिनेते शिवाजी साटम यांचा थक्क करणारा प्रवास ) राजीव गांधी यांच्या हत्येनंतर वर्षभराने जेव्हा निवडणूक होणार होती, तेव्हा कॉंग्रेसची इच्छा होती, की अमिताभ यांनी परत राजकारणात येऊन सोनिया गांधींची मदत करावी. कारण आमिताभ हे राजीव गांधी यांना तसंच सोनिया गांधींना सुद्धा चांगल्याप्रकारे ओळखत होते. (वाचा: वडील इरफान आणि BIG B यांचा फोटो शेअर करत भावुक झाला बाबिल; व्यक्त केली एक इच्छा ) ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किदवई यांनी आपल्या ‘नेता-अभिनेता: बॉलीवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटीक्स’मध्ये भारतीय राज्यकर्ता सुमंत मिश्रा यांच्या पुस्तकाच्या आधारे लिहिलं आहे. अमिताभ यांनी राजकारणात परतण्याचा प्रस्ताव नाकारत सालस उत्तर दिलं होतं. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे अमिताभ यांनी उत्तर दिलं होतं, की ’मी कोणतीही जबाबदारी घेतल्यानंतर त्यात स्वतःला झोकून देतो, कोणत्याही परिस्थितीत मी ती जबाबदारी पार पाडतो आणि राजीव माझे खूप चांगले मित्र होते, मी सोनिया यांचा शुभचिंतक आहे. मात्र माझ्या राजकारणात येण्याने त्याचं दुख कसं कमी होईल? त्या स्वतः खूप मजबूत आहेत, आत्मविश्वासी आहेत आणि सक्षम आहेत. त्यांना चांगल्याप्रकारे माहित आहे की त्याना काय करायला हवं आणि काय नको.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.