बॉलीवूडचा एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक त्याचबरोबर निर्माता असणारा अजय देवगन आज 52 वर्षांचा झाला आहे. यानिमित्ताने त्याच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.
अजय देवगनला बॉलीवूडमध्ये त्याच्या खास स्टंटच्या शैली साठी ओळखलं जातं. त्याच्या प्रत्येक चित्रपटात भरभरून स्टंट पाहायला मिळतात.
अजय देवगनचे वडील विरू देवगन हेसुद्धा बॉलीवूडमधील प्रसिद्ध स्टंटमन होते. अजयला हा वारसा इथूनच मिळाला आहे.
अजय देवगणने 1991 मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यामध्ये अजयने दुचाकीवर उभं राहून केलेला स्टंट तरुणांमध्ये खुपचं प्रसिद्ध झाला होता.
2002 मध्ये अजयला 'द लेजेंड ऑफ भगतसिंग' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
2011 मध्ये अजयनं रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यात एका शूर पोलिसाची भूमिका अजयनं साकारली होती.
अजयनं 1999 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सोबत लग्नं केलं आहे. काजोल आणि अजय यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांची जोडी चाहत्यांनासुद्धा खुपचं पसंत होती.