मुंबई, 28 एप्रिल- मनोरंजन क्षेत्रात कधी कोणाचं सूत जुळल्याचं तर कधी कोणाचं ब्रेकअप (Breakup) झाल्याचं ऐकायला मिळतचं असतं. सध्या असचं एक जोडपं चर्चेत आलं आहे. बिग बॉस फेम प्रियांक शर्मा (Priyank Sharma) आणि बेनाफ्शा सुनावाला(Benafsha Soonawala) यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. प्रियांक शर्मा ‘बिग बॉस 11’(Bigg Boss 11) मध्ये चर्चेत आला होतां. कारण या दरम्यान त्याची एक्स गर्लफ्रेंड दिव्या अग्रवालने (Divya Agarwal) धोका दिल्याचा आरोप केला होता. दिव्या आणि प्रियांक एकमेकांना ‘स्प्लीटसविला’(Splitsvilla) या MTV वरील कार्यक्रमात भेटले होते. दिव्यानंतर प्रियांक शर्मा बेनाफ्शासोबत नात्यात होता. मात्र नुकताच सोशल मीडियाद्वारे त्याने बेनाफ्शासोबत ब्रेकअपचा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
नुकताच प्रियांक शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बेनाफ्शासोबतचे आपले सगळे फोटो डीलीट केले आहेत. आणि त्याचबरोबर पोस्ट करत म्हटलं आहे, की बेनाफ्शासोबतचं माझं अडीच वर्षांपासूनचं नातं आता संपल आहे. प्रियांकच्या या पोस्ट नंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे.
View this post on Instagram
प्रियांकने बेनाफ्शासोबत ब्रेकअपची गोष्ट जाहीर केल्या नंतर त्याला युजर्सकडून खुपचं ट्रोल केलं जातं आहे. अनेक अपमानास्पद कमेंट्स त्याच्यावर केल्या जात आहेत. अनेकजण त्याच्यावर फसवणुकीचा आरोप लावत आहेत. तर काहीजण त्याला परत बेनाफ्शा सोबत नात्यात येण्यास सांगत आहेत. सोशल मीडियावरून ही माहिती जाहीर करणं प्रियांकला चांगलचं महागात पडलेलं दिसत आहे.
(हे वाचा:सैफ अली खान बनणार 'वैज्ञानिक', साकारणार जहाँगीर होमी भाभा यांची भूमिका )
महत्वाचं म्हणजे यासाठी प्रियांक शर्माला सायबर सेलची मदत घ्यावी लागली आहे. त्याबद्दल लिहिताना प्रियांकनं म्हटलं आहे, ‘मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, इतकं प्रेम की तुम्ही याचा अंदाजसुद्धा नाही लावू शकत. मात्र तुम्ही माझे चाहते तर नसणार, माझा चाहता म्हणून तुम्ही माझ्या खऱ्या चाहत्यांचा अपमान करू नका. गेल्या दोन वर्षांपासून मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातं आहे. वेळ आणि पद्धत एकसारखीच आहे त्याची, तू नक्कीच माझा चाहता असूच शकत नाही. तू एक निर्ल्लज आहेस. मी खरंच खूप कठीण प्रसंगात आहे. आणि मला मदत हवी आहे. अशा आशयाची पोस्ट लिहत प्रियांकने सायबर सेलला सुद्धा टॅग केलं आहे.
(हे वाचा: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा बोल्ड फोटोशूट; व्हायरल PHOTO नी सोशल मीडियावर धुमाकूळ)
याचबरोबर प्रियांकने काही स्क्रीनशॉट सुद्धा पोस्ट केले होते. मात्र सध्या त्याने ते डीलीट केले आहेत. त्याचबरोबर प्रियांक आणि बेनाफ्शाने एकमेकांसोबतचे फोटो सुद्धा काढून टाकले आहेत. यावरूनच त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याचा अंदाजा आला होता. मात्र ये दोघांनीही स्वतः या गोष्टीचा खुलासा केल्याने सर्व काही स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Marathi entertainment