मुंबई, 1 जून- 60 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नर्गिस(Nargis) यांना ओळखलं जातं. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. कित्येक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. मनोरंजन क्षेत्रात आजही त्यांची तितक्याच आत्मीयतेने आणि आदराने आठवण काढली जाते. आज या अष्टपैलू अभिनेत्रीचा वाढदिवस(Birthday) आहे. या निमित्ताने आज आपण त्यांचा एक अनोखा किस्सा जाणून घेणार आहोत. पाहूया काय आहे हा किस्सा.
सर्वांनाचं माहिती आहे की नर्गिस आणि राज कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांची जोडी रील आणि रियल लाईफमध्ये सुद्धा तितकीच खास होती. हे कलाकार एकेमेकांच्या खुपचं जवळ होते. असं म्हटल जात होतं की हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. मात्र त्यांचं हे नात लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. नर्गिस यांनी पुढे अभिनेता सुनील दत्त यांच्याशी लग्न केल होतं.
मात्र यांच्या प्रेमाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात, त्यापैकीच एक हा किस्सा आहे. राज कपूर ‘आवारा’ या चित्रपटाचं शुटींग करत होते. त्यामध्ये अनेक सदाबहार गाणी आहेत. मात्र त्यातील ‘घर आया मेरा परदेसी’ या गाण्याच्या शुटींगमध्ये 8 लाख रुपये खर्च झाले होते.
(हे वाचा: HBD: अशी झाली होती पत्नीशी भेट, पाहा आर. माधवनची अनोखी लव्हस्टोरी )
आणि त्यामुळे पुढील शुटींग पूर्ण करण्यासाठी राज कपूर यांच्याकडे पैसे नव्हते. आणि त्यावेळी अभिनेत्री नर्गिस यांनी आपले सर्व दागिने विकून पैसे जमा केले आणि ते राज कपूर यांना दिले. आणि त्यानंतर पुढील शुटींग पूर्ण झालं. हे त्यांच्या खास नात्याचं उत्तम उदाहारण आहे.
(हे वाचा: 'कविता भाभी' फेम अभिनेत्रीचा BOLD अंदाज, 'शादी करुंगी तो अपने से छोटे लडके से..' )
हे गाणं खुपचं प्रसिद्ध देखील झालं होतं. या चित्रपटातील प्रत्येक गाणं खुपचं पसंत केल गेलं होतं. मात्र या गाण्याच्या चित्रीकरणाची गोष्ट काही वेगळीच होती. आणि इतक्या वर्षानंतर आजही ही सदाबहार गाणी तितक्याच आवडीने ऐकली आणि पहिली जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment