मुंबई, 12 ऑगस्ट : आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमाला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत आहे. सिनेमा बायकॉट करण्याची मागणी जोर धरत असताना सिनेमा काल 11 ऑगस्टला प्रदर्शित झाला. मात्र होणाऱ्या तीव्र विरोधामुळे सिनेमाला हवं तसं यश मिळू शकलं नाही. इतके दिवस केवळ सोशल मीडियावर सुरू असलेल्या या विरोधाला भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी देखील पाठिंबा देत सिनेमाला विरोध केला आहे. लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या माध्यमातून आमिर खान देशविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधात कोल्हापूरात आंदोलन करत सिनेमाच्या पोस्टवर काळी शाई फासण्यात आली आहे. भाजपच्या वतीनं कोल्हापूरच्या पद्मा सिनेमाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलं असून भाजपचे अनेक कार्यकर्ते इथे जमा झाले आहेत. आमिर सातत्यानं देशविरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे लाल सिंह चड्ढा हा सिनेमा थिएटरमध्ये झळकू देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यासाठी कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक होऊन आमिर खान विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तसेच सिनेमाचे पोस्टर फाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. हेही वाचा - राहुल देशपांडेंना ‘लाल सिंह चढ्ढा’च्या समर्थानातील ‘ती’ पोस्ट भोवली; द्यावं लागलं स्पष्टीकरण आमिर सारखा अभिनेता भारतात राहून भारतमातेमुळे इतका मोठा झाला आहे. आज तो त्याची जी परिस्थिती आहे ती भारतात राहून आहे आणि त्याच भारताच्या विरोधात आमिर सिनेमाच्या माध्यमातून भूमिका घेत असेल तर ते भारतीय जनता हे कधीच सहन करणार नाही. केवळ आमिरच नाही तर भारताच्या विरोधात कोणीही असं वक्तव्य करेल त्यांच्यासाठी आमिरच्या माध्यमातून हा धडा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. आमिर खानवर लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या निमित्तानं झालेल्या टीकेनंतर त्यानं समोर येईन सर्वांची माफी मागत तुम्हाली सिनेमा पाहायचा असेल तर नक्की पाहा मी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही. मी काही चुकीचं करत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुमची माफी मागते असं ही आमिर खान म्हणाला. मात्र माफी मागून देखील लाल सिंह चड्ढा सिनेमाचे देशभरातील जवळपास 1300 शो हे रद्द करण्यात आले आहेत. प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली असून आमिर खानचं मोठं नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.