जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बिपाशा बासू आणि करणने 'देवी' ला आणलं घरी; दाखवली चिमुकलीची पहिली झलक

बिपाशा बासू आणि करणने 'देवी' ला आणलं घरी; दाखवली चिमुकलीची पहिली झलक

बिपाशा बासू, करण सिंह ग्रोव्हर

बिपाशा बासू, करण सिंह ग्रोव्हर

बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. लग्नाच्या सहा वर्षानंतर या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 नोव्हेंबर : बी-टाऊनमधून सध्या अनेक गोड बातम्या येत आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आई बाबा झाले त्यानंतर लगेचच अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोव्हरनेही गूडन्यूज दिली. दोन्ही जोडप्यांच्या घरी गोंडस परीचं आगमन झालं असून बिपाशा-आलिया दोघीही एका एका मुलीची आई झाल्या आहेत. अशातच बिपाशा बासूविषयी नवी अपडेट समोर आली आहे. तिचा एक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. लग्नाच्या सहा वर्षानंतर या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. त्यांनी मुलीच्या जन्मानंतर लगेचंच तिचं नाव घोषित केलं. बिपाशा आणि करणने त्यांच्या लेकीचं नाव ‘देवी’ ठेवलं आहे. नुकताच समोर आलेल्या पिंकविलाच्या व्हिडीओनुसार, बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीला रुग्णालयातून घरी आणलं आहे. दोघेही चिमुकल्या देवीसोबत घराजवळ स्पॉट करण्यात आले. व्हिडीओमध्ये दिसतंय की, बिपाशाने मुलीला खूपच प्रेमाने पकडलं आहे. तिने आणि करणने लेकीसोबत पॅप्सला पोझ देत फोटोही काढले. मात्र यावेळी त्यांच्या मुलीचा चेहरा त्यांनी दाखवला नाही.

जाहिरात

बिपाशा आणि बाळाला ठीक असल्याचं पाहून चाहते खूप आनंदी आहेत. व्हिडीओवर कमेंट आणि लाईक करत आपला आनंद व्यक्त करत आहेत. चाहते बिपाशा आणि करणचं कमेंट करत कौतुक करत असून त्यांनी शुभेच्छाही देत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरची ‘अलोन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेट झाली होती आणि 2015 मध्ये एक वर्ष एकमेकांना डेट केलं. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 2016 मध्ये बिपाशा-करणचे लग्न झाले. लग्नानंतर बिपाशाच्या गरोदर असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येत आहेत. पण या वर्षी ऑगस्टमध्ये अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे गरोदरपणाची गोड बातमी शेअर केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात