Home /News /entertainment /

या थीमवर आधारित आहे 'Bigg Boss Marathi'चं नवं घर; नवी अपडेट आली समोर

या थीमवर आधारित आहे 'Bigg Boss Marathi'चं नवं घर; नवी अपडेट आली समोर

सर्वांना उत्सुकता लागून राहिलेला 'बिग बॉस मराठी' हा शो काहीच दिवसात आपल्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी बिग बॉसच्या घारतून काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत.

  मुंबई, 15 सप्टेंबर- सर्वात जास्त चर्चेत असणारा शो म्हणजे 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi 3) लवकरच आपल्या भेटीला येत आहे. मात्र तत्पूर्वीच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दरवर्षी प्रमाणे यावेळी बिग बॉसच्या घरात वेगळं असं काय असणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या लाइव्ह इव्हेंटमध्ये नुकताच याबद्दल खुलासा करण्यात आला आहे.
  सर्वांना उत्सुकता लागून राहिलेला 'बिग बॉस मराठी' हा शो काहीच दिवसात आपल्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी बिग बॉसच्या घरातून काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. हा सीझन तब्बल १४ आठवडे ९९ दिवस चालणार आहे. तसेच यावेळी बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी नव्या असणार आहेत. (हे वाचा:फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते तापसी पन्नूची बहीण!) 'बिग बॉस मराठी'च्या घरी यावेळी वेगळेपण असणार आहे. हे वेगळेपण म्हणजे यावेळी बिग बॉसच्या घरात जास्तीत-जास्त मराठमोळा टच असणार आहे. त्यामुळे घराची रचनासुद्धा अशीच करण्यात आली आहे. मराठी नाटकांचा प्रत्यय आणणारं डेकोरेशन यावेळी घरी करण्यात आलं आहे. (हे वाचा:बापरे! यामी गौतमच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था! पाहून तुम्हालाही भरेल धडकी) तसेच यावेळी घरात वीकेंड का वार हि कन्सेप्ट नसणार आहे. त्या ऐवजी घरात 'बिग बॉस चावडी' भरवण्यात येणार आहे.घराला मराठमोळा टच असल्यामुळे चावडीची कन्सेप्ट लोकांना जास्त जवळची वाटेल.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या