मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'माझ्याशी लगीन करणार का?' उर्फीच्या अतरंगी कपड्यांवर चाहत्याला जडलं प्रेम

'माझ्याशी लगीन करणार का?' उर्फीच्या अतरंगी कपड्यांवर चाहत्याला जडलं प्रेम

बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT)’ माजी स्पर्धक उर्फ ​​जावेद(Urfi Javed)   सोशल मीडियावर अतरंगी कपड्यामुळे चर्चेत असते. यावेळी उर्फीचा नवीन ड्रेस पाहून एका नेटकऱ्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली आहे.

बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT)’ माजी स्पर्धक उर्फ ​​जावेद(Urfi Javed) सोशल मीडियावर अतरंगी कपड्यामुळे चर्चेत असते. यावेळी उर्फीचा नवीन ड्रेस पाहून एका नेटकऱ्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली आहे.

बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT)’ माजी स्पर्धक उर्फ ​​जावेद(Urfi Javed) सोशल मीडियावर अतरंगी कपड्यामुळे चर्चेत असते. यावेळी उर्फीचा नवीन ड्रेस पाहून एका नेटकऱ्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली आहे.

मुंबई, 23 डिसेंबर- बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT)’ माजी स्पर्धक उर्फ ​​जावेद(Urfi Javed)   सोशल मीडियावर अतरंगी कपड्यामुळे चर्चेत असते. यावेळी उर्फीचा नवीन ड्रेस पाहून एका नेटकऱ्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली आहे. तिचा हा लुक सोशल मीडयावर चर्चेचा विषय ठरला आहे. या निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली उर्फी वेगळ्या अंदाजात दिसली असून उर्फीचा नवा लुक पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.उर्फीचा हा निळा ड्रेस डिझायनर रीमा यांनी बनवला आहे. उर्फीचा मेकअपही आउटफिटशी जुळणारा आहे. या आउटफिटसह उर्फीचे केस सर्वांचे लक्षवेधून घेत आहेत. लांब पोनीटेलमध्ये उर्फीने तिच्या पोशाखाशी जुळणारे एक्सेसरीज घातले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट करत एका चाहत्याने तिला लग्नाची मागणी घातली आहे.

वाचा-'छोटे उस्ताद' चा तो Video पाहून अभिनेत्री म्हणतेय मराठी शाळा बंद करा!

पण उर्फीचा हा ड्रेस समजण्याचा पलीकडे आहे. ड्रेससोबतच तिनं शॉर्ट्स, पँट आणि कोटही घातला आहे. तिची केसांची स्टाईल देखील बरेच वेगळी आहे. उर्फीच्या या पोस्टवर चाहतेही कमेंट करत आहेत. चाहते तर तिच्या फोटोंची वाटच पाहत असतात.

उर्फीची अनेकदा तिच्या कपड्यांवरून खिल्ली उडवली जाते. पण तरीही पूर्ण आत्मविश्वासाने उर्फी प्रत्येक वेळी वेगवेगळे ड्रेस घालून फोटोशूट करत असते. तिच्या कपड्यांमुळेच उर्फीची फॅन फॉलोइंगही वाढली आहे. बिकिनीपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या वेस्टर्न आउटफिट्स ती आरामात कॅरी करते. ज्यासाठी तिचे खूप कौतुकही केले जाते. पण या कपड्यांमुळे तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते.

वाचा-Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा! PHOTO आले समोर

उर्फीने तिच्या अतरंगी कपड्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या उर्फीकडे कोणतेही काम नाही. यावर ती म्हणते की, आता त्याला कोणी काम द्यायला का तयार नाही. उर्फीच्या रिलेशनशिपबद्दल सांगायचे तर ती अनुपमा शोच्या पारस कालनावतला डेट करत होती आता तिचे ब्रेकअप झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फी जावेद उत्तर प्रदेशातील लखनऊची आहे. तिने 2016 मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' या टीव्ही शोमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यासह तिने 'चंद्र नंदनी', 'सात फेरे की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जिजी माँ', 'दयान', 'ये रिश्ता क्या कहलाता है', यामध्ये काम केलं आहे . त्यानंतर ती पुन्हा बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली. उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे बऱ्याचदा ट्रोल होते, पण तरी देखील उर्फी नेहमी सोशल मीडियावर आपले बोल़्ड फोटो शेअर करत असते.

First published:
top videos

    Tags: Bigg Boss OTT, Bollywood News, Entertainment