मुंबई, 22 डिसेंबर : स्टार प्रवाहवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ (Me Honar Superstar) हे संगीताचं नवं पर्व सुरु झाले आहे. प्रेक्षकांकडून या शोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या शोशी संबंधित एक व्हिडीओ स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवरू सध्या हा कार्यक्रम ट्रोल होत आहे. यासंबंधी एका मराठी अभिनेत्रीने (marathi actress chinmayee sumeet ) पोस्ट केली आहे. यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. नेमके या व्हिडिओत काय आहे? स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओत, इथं सुत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर व्यासपीठावर स्पर्धक म्हणून असणाऱ्या एका लहान मुलांस मिळालेल्या गुणांची बेरीज विचारताना दिसतो. उत्तर म्हणून हा मुलगा इंग्रजीमध्ये 28 असा आकडा सांगतो. पण, त्यानंतर मराठीमध्ये याला किती म्हणतात असे विचारल्यास मात्र त्याची तारांबळ उडते. पुढे तिथेच असणाऱ्या लहनाग्या सुत्रसंचालक अवनीला देखील तो या मराठी अंकांच्या मुद्द्यावरुन काही अंकाना मराठीत काय म्हणतात विचरतो. त्यावेळी तिला देखील उत्तर देता येत नाही. अवनी 34 ला मराठीत तीन आणि चार असे म्हणते यावर परीक्षकांपासून सर्वजण जोरात हासू लागतात. परीक्षक म्हणून असणाऱ्या सचिन पिळगावकर, वैशाली सामंतही यावर विनोदी अंगानंच व्यक्त होत आहेत. वेशाली सामंत म्हणतात, आकडे कळलेले आहेत, हिशोब येणार आहे त्यामुळे आयुष्य चालेल अशी प्रतिक्रिया दिली.
अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांची नेमकी काय पोस्ट आहे? या सगळ्या प्रकारावरून अभिनेत्री चिन्मयी सुमीत हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिनं म्हटले आहे की, हे रील पाहून तुम्हाला कदाचित ,कदाचित कशाला हमखास हसू येणार आहे…पण हळू हळू असंच होणार आहे. मराठी आकडे, मराठी स्वर , व्यंजनं, मुळाक्षरं सारीच विस्मरणात जाणार आहेत. वेष कसा असावा, खावं प्यावं काय, कुणाचे पुतळे, कुणाचे जयजयकार, खरा इतिहास, खोटा इतिहास, चुकीचा इतिहास ह्यावर संस्कृतीचा ठेका घेऊन वादंग माजवणारे लोक मराठीबद्दल काहीच भूमिका का घेत नाहीत? इतका उबग आलाय आता. आता सरकारने एक आदेश काढून एका फटक्यात बंदच करुन टाकाव्यात मराठी शाळा… चिन्मयीच्या यो पोस्टवर कमेंट करत अनेकांनी मराठी भाषा याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
कमेंटचा पाऊस एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, हेच मराठी कलाकार जेव्हा ह्याचा चित्रपट चालत नाही ना तेव्हा बोंब मारत फिरत असतात. अणि असेच मालिकेत म्हणा कोणत्या कार्यक्रमात हिंदीचे गोडवे गायला जातात तेव्हा ह्यांना लाज वाटत नाही. अरे ह्याच्या पालकांना पण थोडी लाज वाटली पाहिजे.तसेच आपले राज्यकर्ते पण तेवढेच नालायक आहेत मतांन साठी कोणत्या थराला जातील कोणास ठाऊक. मुंबई महापालिकेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे सोडून सीबीएसई घेऊन नाचतात आहे Aditya Thackeray. तर दुसऱ्याने म्हटले आहे की, राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठी मराठी चालू असतं काही जणांच….खरं तर ‘त्या’ लोकांमुळेच मराठी ला वाईट दिवस आलेत. तर आणखी एकाने म्हटले आहे की, शुद्ध मराठी बोलणाऱ्याला एक जातीय विशेषण लावलं की विषय संपतो. शुध्द मराठी बोलणारा हा एक चेष्टेचा आणि हेटाळणीचा विषय होतो. बाबांचा पप्पा आणि आईची मम्मी झाली… तिथेच माझ्या मराठीने मान टाकली.. अशा अनेक कमेंट या पोस्टवर आल्या आहेत.