मुंबई, 11 मे- बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. सलमान खान हिंदी बिग बॉस होस्ट करताना दिसतो. सलमानसाठी बिग बॉस पाहणारे काही चाहते आहे. आतापर्यंत सलमान खानने जितके बिग बॉसचे शो केले आहेत, ते एकापेक्षा एक हिट झाले आहेत. पण बिग बॉस ओटीटीवर येताच त्याच्या होस्टिंगची जबाबदारी करण जोहरवर सोपवण्यात आली. करण जोहरनेही मोठ्या थाटामाटात आणि तितक्याच उत्साहाने शो होस्ट केला, पण आता नवा सीजन येताच करणला मात्र मोठा धक्का बसला आहे. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीजनची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आधी हा शो करण जोहर होस्ट करेल असं मानलं जात होतं, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बिग बॉस ओटीटीचा सीझन 2 करण जोहरच्या हातातून गेला आहे आणि यावेळी तो बॉलिवूडचा ‘भाईजान’ होस्ट करणार आहे. त्यामुळे करणचा पत्ता आता कट झाला आहे, असं काहीसं चित्र निर्माण झालं आहे. दीपिकाच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज! सलमान खान होस्ट करणार बिग बॉस ओटीटी इंडियन फॉर्म्सच्या रिपोर्टनुसार, करण जोहर बिग बॉस ओटीटी सीझन 2 होस्ट करणार नाही. सर्वांचा ऑल टाइम फेव्हरेट सलमान खान सीजन 2 होस्ट करताना दिसणार आहे. बिग बॉस टीव्हीचे अनेक सिजन उत्तम प्रकारे होस्ट करणाऱ्या सलमान खानने आता ओटीटीची जबाबदारी स्वीकारली असून त्यासाठी निर्मात्यांशी र करारही केला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार बिग बॉस ओटीटी सलमान खान जेव्हा टीव्हीवर बिग बॉस ‘वीकेंड का वार’ होस्ट करतो, तेव्हा चाहत्यांना तो एपिसोड सर्वात जास्त आवडतो. फक्त सलमान खानसाठी बिग बॉस पाहणारी मंडळी आहे. अशातच ओटीटीवरलीवरील बिग बॉस देखील सलमान खान होस्ट करणार आहे, याहून चांगली बातमी असूच शकत नाही. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस ओटीटी सीझन 2 जूनच्या अखेरीस सुरू होऊ शकतो. हा शो पूर्वीप्रमाणेच 3 महिने दाखवला जाणार आहे. वूट अॅपवर हा शो पाहता येणार आहे.
मुनव्वर फारुकी होणार या शोचा भाग? शोच्या स्पर्धकांची नावेही समोर येऊ लागली आहेत. लॉकअप विनर मुनव्वर फारूकी देखील बिग बॉस ओटीटीमध्ये दिसू शकतो. मुनव्वर व्यतिरिक्त अर्चना गौतमचा भाऊ गुलशन देखील या शोमध्ये दिसणार आहे. मात्र या वृत्तावर चॅनेल किंवा निर्मात्यांनी अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही.