मुंबई, 17 जून : ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीजन आज. 17 जूनपासून प्रसारित होणार आहे. यंदाचा सीजन सलमान खान होस्ट करताना दिसणार आहे. त्यामुळे यंदाचा सीजन खास ठरणार आहे. याशिवाय या शोमध्ये कोण सहभागी होणार आहे, याची उत्सुकता देखील चाहत्यांना लागली आहे. या शोबद्दल ‘न्यूज 18’ ला एक मोठी अपडेट मिळाली आहे. शोसंबंधीत सूत्रांनी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदाच्या सीजनमध्ये सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसोबत बॉलिवूड जगतातील काही लोकप्रिय चेहरे दिसणार आहेत. शोच्या प्रोडक्शन टीमच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सीजनमध्ये संगीता बिजलानी, जरीन खान आणि डेडी शाह या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सहभागी होणार आहेत. तसेच सूत्रांच्या मते बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनसोबतच सलमानची कोस्टार स्नेहा उल्लाल देखील शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या या नावांवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. या पाचही अभिनेत्री सलमानच्या जवळच्या मैत्रिणी आहेत, त्यामुळं या चर्चा सोशल मीडियावर देखील रंगल्या आहेत. त्यामुळे शेवटी यापैकी कोण घरात एंट्री घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘डायलॉग्ज टपोरी अन् रावण..’ रामानंद सागर यांच्या मुलाने ओम राऊतवर केली जहरी टिका पहिल्यांदा बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाची देखील चर्चा रंगलेली होती. ती सलमानच्या शोत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सनीनं सहभागी होणार नसल्याचे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र यंदाच्या सीजनमध्ये काही लोकप्रिय आणि चर्चेत चेहरे सहभागी होणार आहेत.
मीडिया रिपोट्सनुसार, यंदाच्या सीजनमध्ये स्पर्धक म्हणून अविनाशसदेव, अविनाश सचदेवची र्लफ्रेंड पलक पुरसवानी, नवाजुद्दीन सिद्दीकीचीपत्नी आलिया सिद्दीकी, अभिषेक मल्हान, आकांक्षा पुरी, जिया शंकर, पुनीत कुमार, बेबिका धुर्वे, शीजान खानची बहीण फलक नाज, श्रुती सिन्हा, जेद हदीद, केविन आणि मनीषा रानी हे लोकप्रिय चेहरे दिसणार आहेत.
‘बिग बॉस’ची टीम प्रत्येकवेळी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असते. यंदा या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करणार असून यामध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि स्टार्स स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 2’चा सेट स्पर्धकांसाठी तसेच प्रेक्षकांसाठी एखाद्या सरप्राईज पॅकेजपेक्षा कमी नाही, ज्यात प्रत्येक रूम एक वेगळी गोष्ट सांगताना दिसत आहे.‘बिग बॉस ओटीटी 2’चा सेटचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते की, यंदा स्पर्धकांसमोरील आव्हाने पूर्वीपेक्षा अधिक कठीण असतील.‘बिग बॉस ओटीटी 2’च्या घरातील फोटोंमुळे प्रेक्षकांची या शोबद्दलची उत्सुकता आधिक वाढली आहे.शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणताना दिसत आहे, ‘मी येतोय, बिग बॉस ओटीटीवर. ‘बिग बॉस ओटीटी 2’ 17 जूनपासून ग्रँड ओपनिंगसाठी सज्ज झाला आहे.‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीजन करण जोहरने होस्ट केला होता, ज्याची विजेती दिव्या अग्रवाल झाली.