Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi 3 मधील 'या' स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा

Bigg Boss Marathi 3 मधील 'या' स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा

यंदा बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरात कलाकार मंडळींसह किर्तनकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. या शोमध्ये सध्या एक अशी स्पर्धक आहे ज्यांनी आतापर्यंत चारवेळा तुरुंगाची हवा खाल्ली आहे..

    मुंबई, 26 सप्टेंबर: सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi 3) चर्चा सुरू आहे. हा शो यामधील स्पर्धकांमुळे वेगळा ठरतो. या शोमध्ये येणारा (Bigg Boss Marathi 3 Latest Update ) प्रत्येक स्पर्धक खा असतो त्याच्याकडे काही तरी नवीन असते. यंदा देखील बिग बॉस मराठीच्या घरात कलाकार मंडळींचा समावेश आहेच मात्र किर्तनकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. या शोमध्ये सध्या एक अशी स्पर्धक आहे ज्यांना आतापर्यंत चारवेळा अटक झाली आहे. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai in Bigg Boss Marathi season 3) यांचा आक्रमकपणा त्यांचे महिलांसाठीचे काम सर्वांनी पाहिले आहे. आता त्या बिग बॉस मराठीच्या घरात देखील दिसत आहे. या घरात देखील सुरूवातील शांत दिसणाऱ्या तृप्ती देसाई आता आक्रमक झाल्याच्या दिसत आहेत. त्यांचा घऱातील काही महिला सदस्यांसोबत वाद देखील झाला आहे. तृप्ती देसाई बिग बॉस मराठीच्या घऱात गेल्यापासून सोशल मीडियावर (Trupti Desai on Social Media) चर्चेत आल्या आहेत. तृप्ती देसाईंना त्यांचा आक्रमकपणा बऱ्याचवेळा नडलेला देखील आहे. या बिग बॉसमधीस चर्चेत चेहरा असलेल्या तृप्ती देसाई यांना आता पर्यंत चारवेळा जेलची हवा खावी लागली आहे. त्यांना कोणत्या कारणालाठी जेलमध्ये जावे लागले ..तेही चारवेळा त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहे. Bigg Boss Marathi 3: तृप्ती देसाई आणि शिवलीलामध्ये जोरदार राडा, बाचाबाचीनंतर आता पुढे काय होणार? भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना अनेक अंदोलनातून सर्वांनी पाहिले आहे. त्यांनी ण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून त्यांनी होम सायन्सची पदवी घेतली आहे. सुरूवातीला तृप्ती देसाई यांनी म्हणजे 2003 मध्ये झोपडपट्टी निर्मूलनासाठी कार्य करणारा क्रांतीवीर संघटनेची साथ देऊन आंदोलन केले. यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. (Trupti Desai Arrested) तृप्ती देसाई यांनी 2007 मध्ये अजित को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा उघडकीस आणला. हा घोटाळा जवळपास पन्नास कोटी रुपयांचा होता. यावेळेसही त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी 2010 मध्ये भुमाता ब्रिगेडची स्थापना केली. या भुमाता ब्रिगेडचे कमी काळात 5000 सदस् नोंदवून घेतले होते. या संस्थेची स्थापना करेपर्यंत त्यांचे नाव राज्याच्या घराघऱाचृत परिचित झाले होते. या अंदोलानाच्या माध्यमातून त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तृप्ती देसाई यांनी अजित पवार यांच्या विरोधातील आंदोलन केले होते. या अंदोलनामुळे देखील त्या चांगल्याच चर्चेत आल्या यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून तृप्ती देसाई यांनी नेहमीच आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुरूवातीच्या काळात त्यांनी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा, या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यांच्या या अंदोलनाची माध्यमांनी मोठी दखल घेतली. मंदिर प्रवेशावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना थेट गावाच्या बाहेर अटक करण्यात आली. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील त्यांनी प्रवेश केला होता. यामुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. तसेच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश केला होता. आणि त्यांच्या सोबत काही महिलांना देखील यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. बिग बॉस मराठीचे घऱ देखील दुसरी जेलच म्हणावी लागेल. या घऱात देखील स्पर्धकांना बिग बॉसचे नियम पाळावे लागतात.  त्यामुळे येणाऱ्या काळात तृप्ती देसाई खेळात कशा पुढे जाणार, तसेच प्रेक्षकांची मने जिंकणार के  हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment, Trupti Desai

    पुढील बातम्या