मुंबई, 26 सप्टेंबर: बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3 ) हा काहीसा वादग्रस्त शो असला तरी प्रेक्षकांच्यांमध्ये देखील हा शो तितकाच लोकप्रिय आहे. पहिल्या दिवसापासून मराठी बिग बॉसच्या घरात वादाचा तडका सुरूच आहे. यंदा घऱात विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी झाले आहेत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातील स्पर्धकांमध्ये वाद होत आहेत. सध्या सोशल मीडियावर तृप्ती देसाई आणि किर्तनकार शिवलीला पाटील यांच्यात (Bigg Boss Marathi 3 Latest Update) एका टास्क दरम्यान जोरदार वाद झाला आहे. सोशल मीडियावर या वादाची जोरदार चर्चा रंगलेली आहे. बिग बॉस मराठीच्या घऱात एक टास्क सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्ये किर्तनकार शिवलीला पाटीलच्या फोटोला मोठे कान लावलेले दिसत आहेत. यामध्ये तृप्ती देसाई म्हणताना दिसत आहे की, मला शिवलीला सांगायचे आहे की, तुला स्वताच्या बुद्धीचा वापर करता येतच नाही का? यानंतर सोफ्यावर बसल्यानंतर तृप्ती देसाई आणि किर्तनकार तृप्ती शिवलीला पाटील (Trupti Desai and Shivleela Patil Fight) यांच्यात वाद झाल्याचा दिसत आहे. यामध्ये शिवलीला पाटील तृप्ती देसाईंना म्हणताना दिसत आहे की, मोठ्याने बोलल्याने किंवा भांडण केल्याने विचार मांडले असे होत नाही. तर यावर तृप्ती देसाई देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांनी यानंतर असं म्हटलं आहे की, मला देखील प्रबोधनकार म्हणून कोण किर्तनकार मुलगी आल्याची दिसलीच नाही. दोघीही आक्रमक झाल्याचे दिसत आहे. यांच्या भांडणाचे नेमके पुढे काय झाले हे आजच्या भागात पाहण्यास मिळणार आहे. हा वाद आता काय वळण घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. वाचा : बाबो! या अभिनेत्याने खरेदी केली लाखोंची नंबर प्लेट आणि कोट्यवधींची Lamborghini कार, पाहा काय आहे किंमत तृप्ती देसाई यांचा यापूर्वी सोनालीसोबत देखील वाद झाला आहे. त्यामुळे आता घऱातील महिला मंडळ देखील शिवलीला पाटीलोसोबतच्या वादानंतर कोणाच्यासोबत उभे राहते हे पाहावे लागेल. यंदाचा सीजन एतर दोन सीजनप्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. कारण सोशल मीडियावर सगळीकडे मराठी बिग बॉसची चर्चा दिसत आहे. सोशल मीडियावर काहींनी या भांडनानंतर शिवलीला तर काहींनी तृप्ती देसाई यांना पाठींबा दिला आहे.
शिवलीला पाटीलने आजवर कीर्तनाच्या माध्यमातून अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे. मात्र, मराठी बिग बॉस मध्ये ती सहभागी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याचप्रमाणे तिच्यावर अनेकांनी टीका देखील केली आहे. तर दुसरीकडे भुमाता ब्रिगेड तृप्ती देसाई देखील या शोमध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे दोन वेगळ्या विचारांच्या व्यक्ती एकत्र आसल्यानंतर त्यांच्यात वाद होतोच. काहींनी या दोघींच्यामध्ये वाद होणार अशी शक्यता वर्तवली होती. आता तसेच काहीसे चित्र दिसत आहे यापूर्वी देखील इंदुरीकर महाराज यांच्यावरून दोघींच्यात झाला होता वाद यापूर्वी देखील घरात इंदुरीकर महाराज यांचा विषय निघाला आणि शिवलीला म्हणाल्या, ‘तृप्ती यांनी इंदुरीकर महाराजाच्यां विरोधात केस केली होती.’ यावर उत्तर देत ‘इंदुरीकर महाराजांची किर्तन महिलांचा अपमान करणारी असतात. आमच्या आंदोलनानंतर युट्यूबवरून जवळपास 80 किर्तनाचे व्हिडिओ डिलीट केले. कारण तेव्हा आम्ही मोहीमच सुरु केली होती, त्यावेळी संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात होता,’ असे तृप्ती म्हणाल्या. महिलांनी फेटा घालू नये, असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते. महिलांनी फेटा घातला तर आम्ही काय गाऊन घालायचं का? त्यांनी केलेलं हे विधान चुकीचं होतं. शिवलीला देखील किर्तनाचे अनेक कार्यक्रम करताना फेटा घालतात, अनेक ठिकाणी फेटा घातला जातो त्यात चुकीच असं काय?’ हे ऐकल्यानंतर शिवलीला म्हणाल्या, मी फक्त किर्तन करताना फेटा घालते, इतरवेळी नाही. यावेळी देखील यांच्यातीवल वैचारिक मतभेद दिसून आले होते.