Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात होणार नवी वाईल्ड कार्ड एन्ट्री! आदिशनंतर ही अभिनेत्री बनणार स्पर्धक

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात होणार नवी वाईल्ड कार्ड एन्ट्री! आदिशनंतर ही अभिनेत्री बनणार स्पर्धक

पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये नवी वाईल्ड कार्ड एंट्री (Wild Card Entry) होणार आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

  मुंबई,30ऑक्टोबर- बहुचर्चित आणि वादग्रस्त शो म्हणून ''बिग बॉस'  (Bigg Boss marathi)  ला ओळखलं जातं.काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीमध्ये अभिनेता आदिश वैद्यची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. मात्र अवघ्या तीन आठवड्यातच तो घराबाहेर पडला. त्यामुळे सर्वांनाचं धक्का बसला होता. त्यांनतर पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये नवी वाईल्ड कार्ड एंट्री  (Wild Card Entry)  होणार आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नीता शेट्टी  (Neeta Shetty)  'बिग बॉस'मराठीमध्ये एन्ट्री करणार आहे. याची नेमकी हिंट तिने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे. नीता शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपला एक फोटो शेअर करत बिग बॉसच्या लोगोमध्ये जे डोळ्याचं फेमस चित्र आहे, ते लावलं आहे आणि सोबतचं 'आय एम वेटिंग' असं म्हटलं आहे.
  तसेच मराठी कलाकार विश्वने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक अभिनेत्री बिग बॉसच्या मंचावर एन्ट्री डान्स करतांना दिसत आहे. मात्र तिला पाठमोरी दाखवण्यात येत आहे. तरीसुद्धा चाहत्यांना ही नीता शेट्टीचं असल्याचं विश्वास वाटत आहे. घरामध्ये अभिनेत्री नीता शेट्टीच्या येण्याने घरात ग्लॅमर आणि सौंदर्याचा तडका लागणार हे नक्की आहे.त्यामुळे शो पाहणे आत्ता आणखीनच मनोरंजक होणार आहे. (हे वाचा:'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एन्ट्री; 'आई कुठे काय करते' मालिकेत) बिग बॉस मराठीचं घर हे सध्या स्पर्धकांच्या वादविवादांनी दणाणून गेलं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने या स्पर्धकांमध्ये खटके उडतच आहेत. त्यामुळे शो पाहणं अधिकच रंजक बनलं आहे.बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क सुरू झाला आहे. टीमने स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांना कॅप्टन पदाचे दोन उमेदवार घोषित केले आहेत. या दोघींमध्ये कडी टक्कर पाहायला मिळत आहे.घरामध्ये जरी दोन स्ट्रॉंग गृप असले तरीदेखील गृपमधील सदस्यांमध्ये तितकासा एकेमकांबद्दल विश्वास दिसून येत नाही. मीरा आणि गायत्रीच्या संभाषणावरून हे कुठतेरी स्पष्ट झाले आहे.तर विकास आणि विशालमधील वाद बघता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे असे दिसून येते आहे. कालदेखील विकास जेव्हा विशालकडे टास्कबद्दल बोलायला गेला तेव्हा विशालने त्याला योग्य ते उत्तर न दिल्याने विकासला वाईट वाटले. अशातच आता घरामध्ये सदस्याची एन्ट्री झाल्याने वातावरणात काय बदल होणार? किंवा ही नवी स्पर्धक कोणती टीम निवडणार आणि कोणत्या टीममधून आपली खेळी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या