Home /News /entertainment /

'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एन्ट्री; 'आई कुठे काय करते' मालिकेत रंजक वळण

'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एन्ट्री; 'आई कुठे काय करते' मालिकेत रंजक वळण

छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karate) ने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आता या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे.

  मुंबई,30ऑक्टोबर- छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karate) ने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आता या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत सतत अरुंधतीला(Arundhati) आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी लढावं लागतं. संजना अर्थातच तिच्या नवऱ्याची प्रेयसी प्रत्येक वेळी तिच्या स्वाभिमानाला तडा देण्याचा प्रयत्न करत असते. या दोघींनमधला हा संघर्षचं प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. सध्या मालिकेत अरुंधती एकटी पडली आहे. तिला तिच्या सारख्याच एखाद्या मित्राची गरज आहे. त्यामुळेच मालिकेत नवीन ट्विस्ट आणण्यासाठी अरुंधतीच्या कॉलेज फ्रेंडची एंटर होणार आहे. त्यामुळे मालिका पाहणं आणखीनच औत्सुक्याचं ठरणार आहे.
  स्टार प्रवाहवर 'आई कुठे काय करते' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मालिकेतील दररोज येणाऱ्या नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. अशातच मालिकेत एक धमाकेदार ट्विस्ट येणार आहे. अनेक दिवसांपासून अरुंधतीच्या जोडीला एखादा अभिनेता येणार अशी चर्चा सुरु होती. त्यातल्या त्यात अभिनेता समीर धर्माधिकारी हा अभिनेता असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र नुकताच राजश्री मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अरुंधतीला सपोर्ट करण्यासाठी मालिकेत कोण एंट्री करणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आता संपली आहे. कोण असणार हा अभिनेता- 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या जोडीला एका नव्या एंट्री अभिनेत्याची एंट्री होत आहे. हा अभिनेता समीर धर्माधिकारी नसून ओंकार गोवर्धन(Onkar Govardhan) हा आहे. ओंकार हा मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. झी युवावरील'लव्ह लग्न लोचा' या मालिकेत सुमित ही भूमिका साकारली होती. या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तसेच ओंकारने 'सावित्री ज्योती' या मालिकेत ज्योतिराव फुले हि मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनतर आता 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत या अभिनेत्याला पाहण्यासाठी लोक फारच उत्सुक आहेत. (हे वाचा:Imlie: आगीच्या एका ठिणगीने घेतला असता जीव;मयुरी देशमुखचासोबत सेटवर घडली भयानक ..) काय असणार भूमिका- अभिनेता ओंकार गोवर्धन हा 'आई कुठे काय करते' मालिकेत आशुतोष केळकर ही भूमिका साकारणार आहे. आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेज मित्र म्हणून एंट्री घेणार आहे. कॉलेजनंतर बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोष यांची भेट होणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. एक या दोघांमध्ये फक्त मैत्रीचं कायम राहते की अनिरुद्धचा विचार सोडून अरुंधतीचं आशुतोषसोबत नातं बहरत हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या